
पुणे – आजच्या धावपळीच्या जीवनात तणावमुक्त होऊन खरा आनंद मिळवायचा असेल, तर अध्यात्म आणि साधना यांचा अवलंब करणे अनिवार्य आहे. मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी प्रत्येक श्वासागणिक नामजप करून ‘ईश्वरप्राप्ती’ हेच अंतिम ध्येय ठेवावे, असे विधान सनातन संस्थेच्या डॉ. ज्योती काळे यांनी केले.

सिंहगड रस्ता येथील नांदेड सिटीमधील श्री स्वामी समर्थ मठ आणि महाअवतार बाबा मठ येथे आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचा लाभ १५० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. उपस्थित अनेकांनी शंकांचे निरसन करून घेऊन साधना करण्याचा निश्चय केला.
या वेळी महाराष्ट्रात महाअवतार बाबाजींचे मठ स्थापन करणारे संत गुरुश्री यांचा सत्कार सनातनचे धर्मप्रेमी श्री. बाळकृष्ण घोरपडे यांनी केला.
विशेष
१. कार्यक्रमाच्या प्रसारासाठी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रकाश गोरे, कु. रागिणीताई लगड आणि श्री. सचिन भावे यांनी सहभाग घेतला.
२. या वेळी लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या कक्षाला जिज्ञासूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

३. या वेळी अनेक जिज्ञासूंनी ‘सनातन पंचांग ॲप’ https://play.google.com/store/apps/details?id=com.sanatan.panchang
उत्स्फूर्तपणे डाऊनलोड करून घेतले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !