चिखली (कराड) येथे सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन

कराड (जिल्हा सातारा), २९ डिसेंबर (वार्ता.) – सध्या मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु धर्मियांची स्थिती केविलवाणी झाली आहे. यासाठी जिज्ञासूंनी सनातन संस्थेच्या साधना सत्संगाला आणि धर्मशिक्षणवर्गाला यावे. तेथे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या कराड तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आयोजित प्रवचनामध्ये बोलत होत्या. कार्यक्रमाला चिखली आणि पंचक्रोशीतील ५०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ. भक्ती डाफळे यांनी केले.

विशेष
या कार्यक्रमासाठी चिखली ग्रामपंचायत, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखली यांचे अमूल्य सहकार्य लाभले. गावातील आजी-माजी सैनिक संघटना, गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ, रामचंद्र सावंत मंडप डेकोरेटर्स सेवा, श्री. बाबूराव कांबळे यांनी जनरेटर सेवा, तर श्री. प्रमोद विष्णु सावंत यांनी प्रोजेक्टर सेवा उपलब्ध करून दिली.
संत आणि मान्यवर यांची वंदनीय उपस्थिती !
येथील वारकरी संप्रदायाचे प्रमुख ह.भ.प. अच्युत महाराज लोहार, ‘अन्नपूर्णा सेवाभावी संस्थे’चे अध्यक्ष श्री. प्रमोद विष्णु सावंत, चिखली गावच्या सरपंच सौ. नीलम कृष्णात सावंत, ‘आजी-माजी सैनिक संघटने’चे उपाध्यक्ष निवृत्त सुभेदार भीमराव बाबूराव सावंत आदी संत आणि मान्यवर उपस्थित होते.
| कडाक्याच्या थंडीतही सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन पूर्ण होईपर्यंत एकही जिज्ञासू जागेवरून उठला नाही. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या देवतांची सात्विक चित्रे, नामपट्टी, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. |
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !