सनातन संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी !

जिल्ह्यातील समर्थनगर, सातारा परिसर, हर्सूल आणि रांजणगाव येथे एकूण ४ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.

भारतभरात सनातनच्या विविध भाषांतील ग्रंथांचे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशन

१० जुलैला भारतभरात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळे पार पडले. यांत सनातनचे खालील ग्रंथ, लघुग्रंथ आणि ‘ई-बुक’ यांचे प्रकाशन करण्यात आले.

सनातन संस्थेच्या विचारांनुसार मार्गक्रमण करणे आवश्यक ! – गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे

आपण देवाकडे थेट बोलू शकत नाही. त्यासाठी गुरूंची आवश्यकता भासते. आपला पहिला गुरु आई असते.त्यानंतर वेगवेगळ्या रूपांत ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. या वेळी ते म्हणाले….

गुरुपौर्णिमा महोत्सवातील मान्यवरांचे विचार आणि अन्य सूत्रे

गोवा, कराड, चंद्रपूर येथे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवातील क्षणचित्रे आणि मान्यवरांनी मांडलेले मौलिक विचार जाणून घेऊया.

सनातन संस्थेच्या वतीने गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सच्चिदानंद प्ररब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देणारी चलचित्रे दाखवण्यात आली. या वेळी गुणवंत साधक विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. गुरुपौर्णिमा महोत्सवात जिज्ञासू आणि साधक यांची उपस्थिती लाभली होती.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात मराठी भाषेत ६४ ठिकाणी, हिंदी भाषेत ८, तामिळ आणि मल्ल्याळम् भाषेत प्रत्येकी २, तर गुजराती भाषेत एका ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला.

रामनवमीच्या निमित्त पुणे येथे प्रवचन, ग्रंथप्रदर्शन कक्ष आदी उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्रीरामनवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक कार्यरत असते. याचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने श्रीरामनवमी सामूहिक नामजप आणि प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

देहली येथील ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’त सनातन संस्‍थेचा सहभाग

देहली येथील भारत मंडपम् येथे ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन राष्ट्‍रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रे’मध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या वतीने अध्‍यात्‍मप्रसार

इंदूर (मध्‍यप्रदेश) – येथील दसरा मैदानावर ‘तरुण जत्रे’चे (‘फूड फेस्‍टिव्‍हल’चे) आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, धर्मजागृती आणि राष्ट्‍ररक्षण या विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन, तसेच हिंदु धर्म संस्कृतीविषयी वैज्ञानिक माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

हिंदूंनी नामजप आणि धर्मपालन केल्यास लाभ निश्चित ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

कलियुगात प्रत्येक जण आनंद मिळवण्यासाठी धडपडतो; मात्र आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विविध त्रासांना सामोरे जावे लागते. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे आणि आपल्या कुलदेवीचा नामजप केल्यास प्रारब्ध सुसह्य होण्यास साहाय्य होते….