
कन्नूर (केरळ) – जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने मांगड श्रीथिरुवांबडी श्रीकृष्ण मंदिर आणि पदन्नपालम श्री मुथप्पन मंदिर या २ ठिकाणी आध्यात्मिक विषयावर २५ डिसेंबर २०२५ या दिवशी प्रवचन पार पडले. सनातन संस्थेचे साधक श्री. कनकराज यांनी उपस्थितांना ‘दैनंदिन जीवनात आध्यात्मिक विज्ञानाचे महत्त्व, सनातन धर्म आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यांविषयी सांगितले.
या दोन्ही ठिकाणच्या प्रवचनाचा लाभ अनेकांनी घेतला. या प्रवचनानंतर माथ्रू समितीच्या (मंदिराशी संबंधित महिला गट) सदस्यांनी मंदिरात नियमित सत्संग आयोजित करण्यात रस दर्शवला, तसेच पदन्नपालम श्री मुथप्पन मंदिरातही सत्संग चालू झाला. या दोन्ही ठिकाणच्या मंदिर समित्यांनी प्रवचनासाठी पुष्कळ सहकार्य केले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !