सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन प्रदर्शनाचे कौस्तुभबुवा रामदासी यांच्या हस्ते उद्घाटन !

सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना कौस्तुभबुवा रामदासी

मिरज (जिल्हा सांगली), २५ सप्टेंबर (वार्ता.) – शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त येथील ब्राह्मणपुरीतील श्री अंबाबाई मंदिराजवळ सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन येथील श्रीवेणास्वामी मठाचे मठाधिपती कौस्तुभबुवा रामदासी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि दीपप्रज्वलन करून झाले. या वेळी ह.भ.प. मिलिंद कुलकर्णी आणि ईश्वरभक्त श्री. चंद्रशेखर कोडोलीकर उपस्थित होते. हे प्रदर्शन २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सनातनचे साधक श्री. किरण कुलकर्णी यांनी भेटवस्तू देऊन कौस्तुभबुवा रामदासी यांचा सत्कार केला. उद्घाटनानंतर कौस्तुभबुवा रामदासी यांनी ब्राह्मणपुरी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट देऊन आश्रमदर्शन केले.

(डावीकडून) ह.भ.प. मिलिंद कुलकर्णी, मठाधिपती कौस्तुभबुवा रामदासी यांना भेटवस्तू देतांना श्री. किरण कुलकर्णी आणि ईश्वरभक्त श्री. चंद्रशेखर कोडोलीकर.

Leave a Comment