पुणे येथे सनातन संस्थेच्या आध्यात्मिक, धार्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन प्रदर्शनकक्षांचे उद्घाटन !

चतुःशृंगी मंदिर (पुणे) आणि भवानीमाता मंदिर (आकुर्डी) येथे प्रदर्शनकक्ष

चतुःशृंगी येथील प्रदर्शनकक्ष

पुणे, २३ सप्टेंबर (वार्ता.) – शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा एक भाग म्हणून आकुर्डी (चिंचवड) येथील भवानीमाता मंदिर आणि पुणे येथील ‘चतुःशृंगी’ या स्वयंभू जागृत शक्तीस्थानाच्या ठिकाणी सनातनची सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत भवानीमाता मंदिर येथे सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत, तसेच चतुःशृंगी येथे सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत असेल. भाविकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

आकुर्डी येथील भवानीमाता मंदिरात देवीची ओटी भरून प्रदर्शनकक्षाचा प्रारंभ करण्यात आला. पुणे येथे चतुःशृंगीदेवी मंदिरातसुद्धा देवीची पूजा करून प्रारंभ झाला. या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी नवरात्रीविषयी मार्गदर्शन करणारी प्रवचने, सामूहिक नामजप आणि प्रदर्शनकक्ष यांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment