लोकहो, प्रवचन घेण्यासाठी सनातन संस्था कोणतेही मूल्य आकारत नाही, हे लक्षात घ्या आणि अपप्रचारांपासून सावध रहा !

सनातनच्या वतीने सर्व प्रकारची प्रवचने ही विनामूल्यच घेण्यात येतात. सनातन संस्था ही धर्मप्रसार करणारी संस्था असून केवळ प्रवचनच नव्हे, तर संस्थेच्या वतीने राबवण्यात येणार्‍या कोणत्याही उपक्रमासाठी पैसे घेण्यात येत नाहीत.

दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या विरोधात सनातन संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा !

सनातन संस्थेच्या वाढत्या प्रसाराची व्याप्ती आणि संस्थेचा समाजातील नावलौकिक माहिती असतांना संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने संस्थेच्या विरोधात मानहानीकारक लेख प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केली.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्यात कोणता अडथळा आहे ?’

कर्नाटकातील वार्ताभारती या धर्मांध चालवत असलेल्या दैनिकातून सनातन संस्थेवर सरकार बंदी का घालत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित करून सनातनवर खोटे, बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. या दैनिकाचे संपादक आणि प्रकाशक अब्दुसालम पुथिगे असून वृत्तसंपादक बी.एम्. बशीर हे आहेत.

देवतांच्या विडंबनाविरुद्ध सनातन चळवळी (मोहिमा) राबवत असतांना सनातनची प्रकाशने आणि उत्पादने यांवर देवतांची चित्रे का ?

सनातनची नियतकालिके, उत्पादने, ग्रंथ अन् प्रसारसाहित्य यांवर देवतांची चित्रे किंवा गुरुकृपायोगाचे (गुरु-शिष्याचे) बोधचिन्ह का ?, असा प्रश्‍न एखाद्याला पडू शकतो. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

सनातनच्या विरोधात सीबीआय आणि प्रसिद्धीमाध्यमांतील काही लोक नियोजनबद्धरितीने षड्यंत्र रचत आहेत ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

सनातनच्या विरोधात सीबीआय आणि प्रसिद्धीमाध्यमांतील काही लोक नियोजनबद्धरितीने षड्यंत्र रचत आहेत, असे परखड सत्य सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी प्रूडंट वाहिनीचे संपादक प्रमोद आचार्य यांनी घेतलेल्या मुलाखतीत मांडले.

सनातन संस्थेचा नव्हे, तर हिंदु धर्माचाच द्वेष करणारे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र !

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या २००० या वर्षीच्या वार्षिक विशेषांकात मठ्ठ, बुरसटलेली मानसिकता जपणारी सनातन संस्था ! या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सनातन संस्थेविषयीचे आक्षेप आजही तेच आहेत; म्हणून आमच्या वाचकांसाठी त्यातील उतारे वैचारिक प्रतिवादासह प्रसिद्ध करत आहोत.

संमोहन आणि संमोहन-उपचार यांविषयीचे अपसमज !

संमोहनाविषयी लोकांच्या मनात जेवढे गैरसमज, भय अथवा कुतुहल असते, तेवढे विज्ञानाच्या इतर कुठल्याही शाखांविषयी नसते. डॉ. (सौ.) आशा ठक्कर या मानसोपचार या विषयात एम्.डी आहेत. त्यांनी विशद केलेले संमोहन व संमोहन-उपचार यांबद्दलचे अपसमज येथे देत आहोत.

खोटे लिखाण प्रसिद्ध करणार्या प्रा. श्याम मानव यांच्यावर विश्‍वास कसा ठेवायचा ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर गेली अनेक वर्षे एकाच प्रकारचे आरोप करणारे अंनिसचे प्रा. श्याम मानव सध्या अनेक वृत्तवाहिन्यांवर जाऊन सनातनवर बेछूट आरोप करत आहेत. त्याविषयीचे खंडण येथे देत आहोत !

पुरुषोत्तम आवरे-पाटील यांचे अश्लाघ्य हिंदुद्रोही लिखाण !

धर्मद्रोही युवराज मोहिते संपादित साप्ताहिक कलमनामामधून पुरुषोत्तम आवरे-पाटील यांचे अश्लाघ्य हिंदुद्रोही लिखाण ! (म्हणे) दुर्जनांच्या नाशासाठी सनातन संस्थेचा खतरनाक अजेंडा !