(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्यात कोणता अडथळा आहे ?’

सनातनला आतंकवादी संघटना ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

कर्नाटकातील ‘वार्ताभारती’ या धर्मांधांच्या दैनिकातून सनातनद्वेषाची गरळओक !

कर्नाटकातील वार्ताभारती या धर्मांध चालवत असलेल्या दैनिकातून सनातन संस्थेवर सरकार बंदी का घालत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित करून सनातनवर खोटे, बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. या दैनिकाचे संपादक आणि प्रकाशक अब्दुसालम पुथिगे असून वृत्तसंपादक बी.एम्. बशीर हे आहेत. सनातनवरील आरोप आणि त्याचे खंडन येथे देत आहोत.

सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंबंधी शासनाला
कोणतेही कारण सापडत नसल्यावरून वार्ताभारतीला पोटशूळ !

टीका : सामान्य माणसाच्या हितासाठी किंवा पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढणार्‍या अशासकीय संस्थांच्या निधीची केंद्रशासन चौकशी करते. या संस्थांवर बंदी घालण्यासाठी शासन अशी चौकशी करण्याची शक्यता आहे; मात्र विवादास्पद सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंबंधी याच शासनाला कोणतेही कारण सापडत नाही.

खंडण : सनातन संस्था ही अध्यात्मप्रसार करणारी संस्था असून ती राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठीही कार्य करते. पर्यावरण रक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, भाषा संवर्धन यांसाठी देशभरात स्थापन झालेल्या अनेक संस्था या विदेशी निधी घेऊन हिंदु धर्मविरोधी, भारतीय संस्कृतीविरोधी आणि साम्यवादी विचारसरणी पसरवण्याचे देशद्रोही कार्य करत असल्याचे आढळले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घोटाळा केल्याचे धर्मादाय आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भात धर्मादाय आयोगाने अंनिसचा हा गैरकारभार उघड केला आहे. हा देशद्रोहच आहे. फोर्ड फाऊंडेशनसारख्या भारतात धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या विदेशी संस्थांकडून निधी घेऊन तो निधी कोणत्या कामासाठी वापरला याचा हिशोब अनेक तथाकथित संस्थांनी केंद्र सरकारला दिलेलाच नाही. त्यामुळे शासन या संस्थांची आणि निधीची चौकशी करत आहे. सनातन संस्था असा कोणताही निधी घेत नाही आणि स्थापनेपासून आतापर्यंत आयकर आयोगाला नियमित हिशोब सादर करते.

वार्ताभारतीलाही विदेशातून निधी येतो का, याचीही चौकशी केंद्रशासनाने करायला हवी !

टीका : गोव्यातील सनातन संस्थेवर (या संस्थेवर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा आरोप आहे) बंदी घालण्यासाठी योग्य पुरावे नाहीत. त्यामुळे या संस्थेवर बंदी घालू शकत नाही, असे केंद्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे.

खंडण : सनातन संस्थेवर डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येचा आरोपच नाही. सनातनच्या केवळ दोन साधकांना या प्रकरणी संशयित म्हणून अटक करून त्यांची चौकशी चालू आहे. केंद्र सरकारपेक्षा वार्ताभारतीच्या संपादकांना अधिक कळते का ?

(म्हणे) ‘सनातन संस्थेविषयी केंद्रशासनाची धृतराष्ट्रासारखी भूमिका !

टीका : जेव्हा उच्च न्यायालयाने केंद्रशासनाकडे या संदर्भातील मत मागवले, तेव्हा केंद्रशासनाने सनातन संस्थेवर प्रेमाचा वर्षाव केला. जणू काही संस्था जनकल्याणासाठी कार्य करत आहे. केंद्रशासन धृतराष्ट्राप्रमाणे वागले. दौपदीचे वस्त्रहरण होत असतांना त्याविषयी धृतराष्ट्र काही बोलले नाहीत. त्यातून त्यांच्या राष्ट्राचे आणि मुलांचे अहित झाले. केंद्रशासनाने सनातन संस्थेविषयी घेतलेल्या भूमिकेचे असेच फळ मिळणार आहे.

खंडण : संस्था हिंदूंमध्ये जागृती करत असल्याने आणि तिचे कार्य दिवसेंदिवस वाढत असल्याने धर्मांधांच्या पोटात दुखणारच !

(म्हणे) ‘हेमंत करकरे यांची गूढरित्या हत्या झाली !

टीका : सनातन संस्थेच्या सर्व देशभरातील आतंकवादी कारवाया पहिल्यांदा हेमंत करकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उघड केल्या होत्या; मात्र चौकशी पूर्ण होण्यापूर्वी त्यांची गूढरित्या हत्या झाली.

खंडण : मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाच्या वेळी लढतांना हेमंत करकरे हुतात्मा झाले होते. हे सर्वज्ञात आहे; पण धर्मांध वार्ताभारती याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून करकरे यांची गूढरित्या हत्या झाली, असे धादांत खोटे सांगून समाजाची दिशाभूल करत आहे.

पाकधार्जिणे वार्ताभारती !

टीका : (म्हणे) ‘भारत आणि पाकिस्तान या देशांतच नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये आतंकवाद पसरवण्यास पाकिस्तानचा नाही, तर हिंदूंचा हात ! त्यांनी प्रारंभ केलेल्या चौकशीच्या आधारेच त्यानंतरची चौकशी झाली. यातूनच पुढे मालेगाव, अजमेर आणि समझौता बाँबस्फोट प्रकरणी स्वदेशी आतंकवाद्यांचा हात असल्याचे उघड झाले. हे लोक काम करत असलेल्या संस्थांची नावेही तपास यंत्रणांनी उघड केली. भारत आणि पाकिस्तान या देशांतच नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये आतंकवाद पसरवण्यास या लोकांचा हात आहे.

खंडण : मालेगाव, अजमेर आणि समझौता बाँबस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय यांच्यावर आरोप ठेवून त्यांनाही गेली १० वर्षे कारागृहात ठेवले आहे. या प्रकरणात त्यांचा हात होता, तर एवढ्या विलंबाने आरोपपत्र का दाखल केले ? त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याने आणि हिंदुद्रोही काँग्रेस सरकारमुळे साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासारख्या हिंदूंसाठी वंदनीय असलेल्यांना कारावास भोगावा लागत आहे. हे सत्य वार्ताभारती जाणूनबुजून लपवून ठेवत आहे.

सनातन संस्थेने अजमेर, मक्का मशीद आणि इतर ठिकाणी
स्फोट घडवून आणण्याची योजना राबवल्याचा वार्ताभारतीचा जावईशोध !

टीका : संस्थेचे नाव जेव्हा उघड झाले, तेव्हा त्यावर वेळीच बंदी घालणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. तशी कृती करून सरकारने ‘आपण कुठल्याच प्रकारचा आतंकवाद सहन करणार नाही’, असा संदेश जगाला द्यायला हवा. सनातन संस्थेने अजमेर, मक्का मशीद आणि इतर ठिकाणी स्फोट घडवून आणण्याची योजना राबवली आणि त्याचे खापर निष्पाप मुसलमानांवर ढकलले.

खंडण : मालेगाव, अजमेर आणि समझौता किंवा इतर कुठल्याही बाँबस्फोट प्रकरणात सनातन संस्थेचे नाव कुठेही नव्हते आणि संस्थेने हे स्फोट मुसलमानांनी केले असेही कधी म्हटलेले नाही. केवळ सनातनद्वेषापोटीच वार्ताभारतीचे धर्मांध संपादक असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. (सनातन याविषयी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्याविषयी अधिवक्त्यांचे मार्गदर्शन घेत आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

सनातन संस्थेने भारतातील मुसलमानांमध्ये देशाच्या
विरोधात असंतोषाचे बीजारोपण केल्याचा वार्ताभारतीचा जावईशोध !

टीका : भारतातील मुसलमानांमध्ये देशाच्या विरोधात असंतोषाचे बीजारोपण करण्यात सनातन संस्थेने मोठी भूमिका बजावली आहे. समाजामध्ये सांप्रदायिक अविश्‍वास निर्माण करून धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचा या संस्थेचा दुष्ट हेतू दिसून येतो. त्यांनी घडवलेल्या स्फोटांच्या तुलनेत त्यांनी समाजामध्ये असंतोष आणि अविश्‍वास रुजवून देशाचे तुकडे करण्याचा त्यांचा कार्यक्रम भयंकर आहे.

खंडण : याविषयी एकतरी उदाहरण वार्ताभारतीचे धर्मांध संपादक देऊ शकतात का ? (सनातन याविषयी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्याविषयी अधिवक्त्यांचे मार्गदर्शन घेत आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

सनातन संस्थेने देशाच्या विरोधात युद्ध पुकारल्याचा वार्ताभारतीचा कांगावा !

टीका : अशा प्रकारच्या कारवाया पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा ‘इसीस’ सारख्या संघटना यांनी केल्या असत्या, तर आपण त्याला विदेशी आतंकवाद म्हणून सामोरे गेलो असतो; परंतु भारताचे नागरिक असलेल्या या लोकांनी अंतर्गत भाषा आणि संस्कृती यांचा वापर करून देशाच्या विरोधात युद्ध पुकारले आहे; मात्र केंद्रशासनाला या आतंकवादी संघटनेच्या राष्ट्रविरोधी कारवाया ओळखता न येणे हे दुर्दैव आहे.

खंडण : देशविरोधी कारवायांच्या विरोधात सनातन आणि अन्य समविचारी संघटनाच सर्वांत आधी आवाज उठवतात. त्या देशविरोधी कारवाया कशा करतील ? उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार मुनव्वर सलीम यांचा खाजगी साहाय्यक फरहत हा हेरगिरी करतांना सापडला. त्याविषयी वार्ताभारतीने आवाज उठवला का ? सनातनवर खोटे आरोप करून स्वतःच्या समाजातील लोकांच्या देशविरोधी कारवायांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा खटाटोप आहे.

केंद्रशासनाला आतंकवादाविषयीची भूमिका शिकवायला निघालेले वार्ताभारतीचे संपादक !

टीका : (म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालून आतंकवादाविषयी भारताची भूमिका स्पष्ट करण्याची शासनाला एक संधी !’ मोदी शासन देशांतर्गत आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यास संकोच का करते ? घरगुती आतंकवाद्यांचे संवर्धन करणार्‍या केंद्रशासनाला विदेशी आतंकवादाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याविषयी भारत खरोखरच गंभीर असले, तर त्याने देशांतर्गत आतंकवाद्यांच्या विरोधात मग ते कुठल्याही धर्माचे असोत, कडक पावले उचलली पाहिजेत. आतंकवादाविषयी भारताची भूमिका स्पष्ट करण्याची शासनाला ही एक संधी आहे. या संदर्भात सनातन संस्थेवर बंदी घालून तिच्या सदस्यांना ‘युएपीए’ खाली अटक करण्यास संकोच करू नये.

खंडण : साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आणि इतर निष्पापांना वर्ष २००८ च्या मालेगाव स्फोट प्रकरणात खोटे आरोप ठेवून अटक करून काँग्रेसने त्यांची आतंकवादाविषयीची धर्मनिरपेक्ष भूमिका स्पष्ट केली होती. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने या हिंदूंच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितल्याने काँग्रेसचे बिंग फुटलेे. सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्तावही काँग्रेसच्याच राज्यात धुडकावण्यात आला होता, तरीही वार्ताभारतीच्या संपादकांसारखे धर्मांध लोक सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत, कारण त्यांना ‘या देशात भगवा आतंकवादही आहे’, हे काहीही करून दाखवायचे आहे आणि नेहमी आतंकवादी म्हटले की, धर्मांधच समोर येतात ही प्रतिमा पुसायची आहे. धर्मांधांची ही प्रतिमा सनातनवर बंदी घालून पुसली जाणार नाही, तर त्यांच्या धर्मातील जिहादी विचारसरणी नष्ट करणेच आवश्यक आहे.

हिंदुत्वनिष्ठ खालील पत्त्यावर निषेध नोंदवत आहेत

Editor, Vartha Bharati
Valencia Circle
Valencia, Mangaluru – 575 002

Tel : 0824 2434767

Email : [email protected]
[email protected]

Head Office – Administration
Vartha Bharati
Valencia Circle
Valencia, Mangaluru – 575 002

Tel : 0824 2433844

Mobile: +91 9900350670

Email : [email protected]

राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा निषेध संयत मार्गाने करा !

हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात