सनातन प्रभातविषयी आध्यात्मिक स्तरावर आलेल्या अनुभूती प्रकाशित झाल्यावर थयथयाट करून दैनिकावर कारवाई करण्याची भाषा करणारे ‘मॅक्स महाराष्ट्र’ !

मुंबई – ‘मॅक्स महाराष्ट्र’ या ब्लॉगवर (http://maxmaharashtra.com/6075 वर) २५ ऑगस्टच्या दैनिक सनातन प्रभातच्या अंकातील पृष्ठ ७ वर ‘दैनिक सनातन प्रभातने देहावरील आवरण काढल्याने झालेले लाभ’ या मथळ्याखालील लेखाच्या संदर्भात टीका करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर दैनिक सनातन प्रभातवर कारवाईची अरेरावीची भाषाही करण्यात आली आहे. (भारतात प्रसारित होणार्‍या अनेक वृत्तपत्रांमध्ये भारताविषयी, तसेच हिंदूंविषयी गरळओक केली जाते. त्याच्यावर कधी कारवाई करण्याची भाषा ‘मॅक्स महाराष्ट्र’ करतो का ? वैयक्तिक अनुभूती लिहिणे आणि छापणे हे प्रत्येक व्यक्तीचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असतांना त्याविषयी छापणार्‍या सनातन प्रभातवर मात्र कारवाई करण्यासाठी ‘मॅक्स महाराष्ट्र’ सरसावतो, हे लक्षात घ्या ! – संपादक)

‘तिकडे राम रहीमची अंधभक्ती, इकडे सनातनची अंधश्रद्धा’ या लेखामध्ये सनातनच्या साधिका कु. सोनाली गायकवाड यांनी लिहिलेल्या त्यांच्या वैयक्तिक अनुभूती देण्यात आल्या आहेत. यामध्ये लिहिलेली टीका आणि त्याचे खंडण पुढे देत आहोत.

 

१. (म्हणे) ‘दैनिक सनातन प्रभातमधून
दैनिकातून उघडपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालणे चालू आहे !’

खंडण : दैनिक सनातन प्रभातमधून राष्ट्र-धर्मविषयक वृत्ते आणि साधनाविषयक मार्गदर्शकपर लिखाण (शिकायला मिळालेली सूत्रे, वैयक्तिक अनुभूती, इतरांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आदी) असते. संत, तसेच विविध क्षेत्रांतील तज्ञ, मान्यवर, विचारवंत, पत्रकार यांसह वैज्ञानिकांनीही दैनिक सनातन प्रभातविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत.

 

२. सनातन प्रभातवर कारवाई करण्याची भाषा करणारे मॅक्स महाराष्ट्र !

२ अ. दैनिक सनातन प्रभात अंगावर घेतल्याने
आरोग्याची व्याधी दूर झाल्याचा अजब दावा दैनिक सनातन प्रभातमधून करण्यात आला आहे.

खंडण : ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे ‘मॅक्स महाराष्ट्र’ ! अशा प्रकारचा कुठलाही दावा दैनिक सनातन प्रभातमधून कधीही करण्यात आलेला नाही. साधिकेला आलेली वैयक्तिक अनुभूती छापून आली आहे.

२ आ. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतांना
या अशा अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल सनातन प्रभातवर कारवाई कधी होणार का, हा खरा प्रश्‍न आहे.

खंडण : सनातन प्रभातमध्ये मांडलेले प्रत्येक विचार हे घटना आणि कायदा यांना सन्मान करूनच दिलेल्या असतात. त्यामुळे अशा कारवाई भाषा करणार्‍यांना सनातन प्रभात भीक घालत नाही !

२ इ. सनातनमध्ये छापलेला अनुभव हा अंधश्रद्धा कायद्याचे थेट उल्लंघन आहे

खंडण : अंधश्रद्धा कायद्याचे थेट उल्लंघन कसे होते, हे संबंधितांनी विस्तृतपणे मांडायला हवे. केवळ हवेत विधाने करण्यातून निवळ सनातनद्वेष, बौद्धिक दिवाळखोरी आणि कायद्याचे अज्ञानच स्पष्ट होते.

 

३. सनातन प्रभातवर कारवाई होत नसल्यानेच या भाकडकथा छापल्या
जात आहेत. आता तरी पोलिसांनी या प्रकारची दखल घेत कारवाई करण्याची गरज आहे.

खंडण : सनातन प्रभातच त्याची अपकीर्ती केल्याप्रकरणी आणि त्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी केल्याच्या प्रकरणी मॅक्स महाराष्ट्रवर कायदेशीर कारवाई करण्याविषयी सनातन प्रभात अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.

 

अनुभूती छापण्यामागील सनातन प्रभातचा वैज्ञानिक दृष्टीकोन

सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होणारे लिखाण वाचकाला ‘राज्यघटनेच्या कलम ५१ अ नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याला’ बाधा आणण्यासाठी लिहिलेले नाही. राज्यघटनेने ‘कलम २५’ नुसार व्यक्तीला धर्मपालनाचा आणि धर्मप्रसाराचा अधिकार दिला आहे. न्यायालयांच्या अनेक निवाड्यांतून स्पष्ट झाले आहे की, धार्मिक भावना वरपांगी कशाही वाटल्या, तरी त्यांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार शासन अथवा न्यायालय यांना नाही. तसेच ही ढवळाढवळ केवळ सामाजिक शांतता, नैतिकता आणि आरोग्य धोक्यात येत असेल, तरच करता येते. सनातन प्रभातमध्ये प्रसारित होणारे लिखाण या तिन्ही गोष्टींना धोक्यात आणण्यासाठी लिहिलेला नसून घटनात्मक अधिकाराचा वापर करत अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी आणि धर्माचरण सांगण्यासाठी लिहिलेला आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने प्रसिद्ध करण्यात आलेले अनुभूतीही वैयक्तिकच आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच येतील, असे नाही. समाजात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी वा वैद्यकीय उपचारांना किंवा वैज्ञानिक दृष्टीकोनांना विरोध करण्यासाठीही सनातन प्रभातमधील लिखाण नाही. सनातन प्रभातचा द्वेष करणार्‍यांनी डोळसपणे त्याचा अभ्यास करावा ! – संपादक

 

सनातन प्रभातचा द्वेष करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

१. दैनिक सनातन प्रभातमधून चोहोबाजूला निर्माण होणार्‍या ऊर्जाक्षेत्राविषयी (चैतन्य) ‘पिप’ (पॉलीकाँट्रास्ट इंटरफेरेंस फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाद्वारे, तसेच ‘लोलक फिरवणे’ या (लोलक सात्त्विक वस्तूंवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतोे) माध्यमातून महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने प्रयोग केले आहेत. त्यातून दैनिक सनातन प्रभातमध्ये चैतन्य असल्याचे वैज्ञानिक प्रयोगांतूनही सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे पिप हे तंत्रज्ञान परदेशात बनवलेले आहे. दैनिकातील चैतन्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील उपचार करणे शक्य होते.

२. अशा प्रकारचा अनुभव भारतातील आणि विदेशातील अनेक साधक, वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते यांना आलेला आहे.

३. संबंधित लेख लिहिणारी साधिका ही स्वतः संगणक शास्त्राची पदवीधर (बीसीए) आहे. आणि अनेक वर्षे साधना केल्यावर तिला आलेली ही वैयक्तिक अनुभूती आहे.

 

‘साम वृत्तवाहिनी’वरील चर्चासत्रात
साधिकेच्या अनुभूतीविषयी श्री. सतीश कोचरेकर यांचा सडेतोड युक्तीवाद !

मुंबई – ‘साम वृत्तवाहिनी’वर बाबा राम रहीम यांच्या शिक्षेविषयी चर्चा चालू असतांना सूत्रसंचालक संजय आवटे यांनी मध्येच दैनिक सनातन प्रभातमधील कु. सोनाली गायकवाड यांच्या प्रसिद्ध झालेल्या अनुभूतीचा विषय काढला. त्यांनी चर्चेत सहभागी झालेले हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांना प्रश्‍न विचारला, ‘‘ही अनुभूती वाचून तुम्हाला काय वाटले ?’’ त्यावर श्री. कोचरेकर यांनी त्यांना ‘काहीच वाटले नाही’, असे सांगितले. त्यानंतर आवटे यांनी ‘ही अंधश्रद्धा नाही का ?’ असा प्रतिप्रश्‍न केला. त्यावर श्री. कोचरेकर यांनी उत्तर देतांना म्हटले, ‘‘ही त्या साधिकेची वैयक्तिक अनुभूती आहे. न्यायालयात गीतेवर हात ठेवून सत्य बोलण्याची शपथ घेतो. तिला अंधश्रद्धा म्हणणार का ? ती ज्याप्रमाणे श्रद्धा आहे त्याचप्रमाणे साधिकेची वैयक्तिक श्रद्धा आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment