एका इस्लामी देशात कट्टरवादी संघटनांनी पाठवलेले सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर धादांत खोटे दोषारोप करणारे पत्र

एका इस्लामी देशात एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनाखाली साधना करणाऱ्या साधकांना तेथील कट्टरवादी संघटनांनी पाठवलेले सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर धादांत खोटे दोषारोप करणारे पत्र

मुंबई : एस्.एस्.आर्.एफ्. ही आध्यात्मिक संशोधन करणारी संस्था आहे. अनेक देशांतील जिज्ञासू एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ वाचून त्यांच्या अध्यात्मविषयक शंकांचे निरसन करून घेत आहेत. एका इस्लामी देशातील काही जिज्ञासूंनीही एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनाखाली साधना आरंभली आहे. इस्लामी देशांत इस्लामव्यतिरिक्त अन्य धर्माचा अनुनय करणे, हे इस्लामविरोधी कृत्य समजले जाते. त्यापोटी अत्यंत क्रूर शिक्षाही केल्या जातात. आताही तेथील धर्मांध कट्टरवाद्यांनी साधकांना साधनेपासून परावृत्त करण्यासाठी एस्.एस्.आर्.एफ्. आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर धादांत खोटे आरोप केले आहेत.

हे पत्र सनातन प्रभातच्या प्रतिनिधीला प्राप्त झाल्यावर सनातनवर केलेली टीका आणि त्याचे खंडण येथे दिले आहे.

१. स्वतः बुद्धीवादी आणि संशोधक असल्याचे भासवून
जिज्ञासूंचा बुद्धीभेद करण्याचा कट्टरवाद्यांचा कुटील डाव !

१ अ. टीका

एस्.एस्.आर्.एफ्.च्या आश्रमाला भेट दिलेल्या आणि त्यांच्याशी जवळीक साधलेल्या आम्हा साधकांचा हा समूह आहे.

खंडण

एस्.एस्.आर्.एफ्.च्या कुठल्या आश्रमाला या कथित साधकांनी भेट दिली ?, तसेच या संस्थेच्या कुठल्या साधकांशी जवळीक केली ?, हे धमकीचे पत्र लिहिणारे का सांगत नाहीत ? खोटे बोल; पण रेटून बोल, असा हा प्रकार आहे.

१ आ. टीका

डॉ. आठवले, तसेच त्यांच्या संप्रदायाची धोकादायक तत्त्वे आणि विचार यांविषयी आम्हाला शंका होत्या. आम्ही यावर संशोधन केले आणि देवाच्या कृपेने आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत.

खंडण

स्वतः संशोधक असल्याची टिमकी वाजवणार्यांनी एस्.एस्.आर्.एफ्. किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काय संशोधन केले आणि ते कशा प्रकारे केले, हे प्रथम सांगावे. अशा टिनपाट संशोधकांना स्वतःचे नावही लिहिण्याचे धारिष्ट्य नाही. त्यांनी काय संशोधन केले असेल, हे न समजायला जिज्ञासू दूधखुळे नाहीत !

२. एस्.एस्.आर्.एफ्.विषयीचे पुरावे भारत सरकारकडे
मागण्यास सांगून स्वतःचा खोटेपणा स्वतःच उघड करणारे कट्टरवादी !

२ अ. टीका

आम्ही (एस्.एस्.आर्.एफ्.वर) जे काही आरोप केले आहेत, त्याविषयीचे पुरावे तुम्ही भारत सरकारकडे मागू शकता.

खंडण

कट्टरवाद्यांचे हेच का ते संशोधन ? एस्.एस्.आर्.एफ् ही संस्था ऑस्ट्रेलियास्थित आहे. असे असतांना तिच्या कार्याची माहिती हवी असल्यास अथवा काही कथित पुरावे हवे असल्यास ते भारत सरकारकडे नव्हे, तर ऑस्ट्रेलिया सरकारकडे मागणे आवश्यक आहे. स्वतःला संशोधक, अभ्यासक अशी बिरूदे लावणार्या या मंडळींचा एस्.एस्.आर्.एफ्.विषयीचा अभ्यास किती उथळ आहे, हे यातून दिसून येते.

२ आ. टीका

या पुराव्यांची दाहकता पहाता एस्.एस्.आर्.एफ्. स्वतःचा बचाव करू शकणार नाही.

खंडण

एस्.एस्.आर्.एफ्.च्या विरोधात मोठे घबाड मिळाल्याचा आव आणत हे कट्टरवादी त्याच्या विरोधात हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ! एस्.एस्.आर्.एफ्.च्या विरोधात असले टुकार पुरावे शोधत बसण्यापेक्षा या कट्टरवाद्यांनी प्रथम त्यांचे धर्मबंधू जी जगभर कुकृत्ये करत आहेत, त्याविषयी बोलावे !

२ इ. टीका

कदाचित् ते असेही म्हणतील की, श्री. आठवले हे सरकारचा भ्रष्टाचार उघड करत असल्यामुळे सरकार त्यांच्या विरोधात आहे किंवा हा वाईट शक्तींचा कट आहे.

खंडण

स्वतःचे पाय चिखलात रूतलेल्यांनी एका आध्यात्मिक संघटनेवर आणि सकल प्राणीमात्रांच्या उद्धारासाठी झटणारे अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असे वृथा आरोप करणे संतापजनक !

३. हिंसाचार आणि क्रौर्य यांचा इतिहास असणार्या इस्लामी कट्टरवाद्यांनी
सनातनला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करणे, हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार !

३ अ. टीका

खाली दिलेल्या लिंक्सचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा ! (या कट्टरवादी गटाने गुगलवर माहिती सर्च करून ज्या लिंक आल्या, त्याची सत्यता आणि मागचा-पुढचा संदर्भ न पडताळता त्या इस्लामी देशातील एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना पाठवल्या आहेत. भारतातील हिंदुद्वेष्ट्यांनी सनातनची अपकीर्ती करण्यासाठी दिलेल्या उटलसुलट बातम्यांच्या या लिंक आहेत.)

खंडण

गुगलवर सर्च करून काहीतरी लिंक शोधायच्या आणि सनातनच्या विरोधात पुरावे सापडल्याची कावकाव करायची, हेच मुळात हास्यास्पद आहे ! अशांच्या या कथित पुराव्यांना सनातन भीक घालत नाही !

३ आ. टीका

तुमच्या लक्षात येईल की, डॉ. आठवले यांचे Sanatan.org नावाचे आणखी एक संकेतस्थळ आहे. गुगल, तसेच विकिपीडिया यांवर वरील शब्द शोधल्यास या संघटनेने अविश्वसनीय आणि घातक असे गुन्हे केल्याचे तुमच्या लक्षात येईल.

खंडण

अ. इस्लामी देशातील हे कट्टरवादी ! कापाकापी करणे, शिरच्छेद करणे, बलात्कार करणे यांपेक्षा यांना वेगळे काय येते ? अशांनी सहस्रो लोकांचे जीवन आनंदी करणार्या सनातनवर चिखलफेक करायची, हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार !

आ. कट्टरवाद्यांची ही टोळी जिज्ञासूंना भारत शासनाकडे पुरावे मागण्याचे फुकाचे सल्ले देते. या टोळीने थोडे कष्ट घेऊन स्वतःच भारत शासनाकडे सनातनविषयी विचारणा केली असती, तर सनातनच्या विरोधात असला कुठलाच आरोप सिद्ध झाला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले असते !

इ. मात्र या टोळीला अभ्यास वगैरे काही करायचे नसून जिज्ञासूंची दिशाभूल करायची आहे. त्यामुळे भारतातील सुपारीबहाद्दर वृत्तसंकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तांच्या लिंकचा वापर करून ते स्वतःचा हेतू साध्य करू पहात आहेत !

३ इ. टीका

या संघटनेच्या (सनातनच्या) कारवाया भारतियांना ज्ञात आहेत. ही संघटना या कारवायांविषयी सर्व माहिती झाकून ठेवत असल्यामुळे अभारतियांना ते ज्ञात नाही.

खंडण

अ. सनातनचे कार्य हे अनेक पटींनी वाढत आहे. सनातनचे कार्य लोकांना भावल्यामुळेच असे होत आहे.

आ. आतापर्यंत कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नसतांनाही सनातनवर जे आरोप झाले, त्याला सनातनने सदैव निर्भयपणे उत्तर दिले आहे ! विविध सभा, पत्रकार परिषदा, वर्तमानपत्रे आणि संकेतस्थळे यांच्या माध्यमांतूनही सनातनने यासंदर्भात पारदर्शक आणि स्पष्ट भूमिका सर्वांसमोर मांडली आहे. त्यामुळे माहिती झाकून ठेवण्याचा प्रश्नच नाही !

४. हिंदूंना संघटित करणार्या hindujagruti.org विषयी इस्लामी कट्टरवाद्यांना पोटशूळ !

४ अ. हिंदु जनजागृती समिती आणि एस्.एस्.आर्.एफ्. एकच असल्याचे सांगून स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करणारे कट्टरवादी !

टीका

hindujagruti.org हे संकेतस्थळही त्यांचेच आहे.

खंडण

अ. हिंदु जनजागृती समिती ही विविध धार्मिक संघटना, संप्रदाय, धर्माभिमानी, हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी अधिवक्ते यांना संघटित करण्याचे कार्य करते, तर एस्.एस्.आर्.एफ्. ही आध्यात्मिक संघटना असून जगभरातील जिज्ञासूंना साधना शिकवते.

आ. या दोन्ही संघटनांचा दुरान्वयेही संबंध नसतांना त्यांचा संबंध जोडणे, हा वड्याचे तेल वांग्याला लावण्याचा प्रकार होय.

४ आ. इस्लामी कट्टरवाद्यांनी हिंदु जनजागृती समितीला कट्टर संबोधणे, या चोराच्या उलट्या बोंबा !

४ आ १. टीका

समितीचे संकेतस्थळ कट्टरवादी असून भारतातील काही उजव्या विचारसरणीच्या राजकीय संघटनांशी संगनमत करून ते चालवले जाते.

खंडण

हिंदु जनजागृती समिती धर्मांध मुसलमान हिंदूंवर करत असलेल्या अत्याचारांना वाचा फोडते. हे इस्लामी कट्टरवाद्यांना रूचत नसल्यामुळे ते समितीलाच कट्टरवादी ठरवण्याचा घाट घालत आहेत ! या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. हिंदू हे जाणून आहेत. समितीचा राजकीय संघटनांशी संगतमत असल्याचे संशोधन करणार्यांतनी त्यांची नावे लिहिली असती, तर बरे झाले असते.

४ आ २. टीका

ते हिंदु राष्ट्र म्हणजे सर्व पंथांना एकत्रित आणण्याचा ते दावा करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र कट्टर हिंदु संघटनांना एकत्र करून भारतातील इस्लाम अन् ख्रिस्ती पंथांना, तसेच इतर अल्पसंख्यांक लोकांना नष्ट करणे आणि संपूर्ण जगाला हिंदु बनवणे, असा त्याचा अर्थ आहे.

खंडण

हिंदु धर्माचा प्रसार करणे आणि हिंदूंना धर्माचरणासाठी उद्युक्त करणे, हे काही इस्लाम आणि ख्रिस्ती यांना विरोध करणे नाही ! इस्लाम आणि ख्रिस्ती यांनी आतापर्यंत हिंदूंना तलवारीच्या जोरावर किंवा बळजोरीने बाटवले आहे. याविषयी समिती जागृती करत असल्यामुळे इस्लामी कट्टरवाद्यांना पोटशूळ उठला आहे !

५. सनातनची अपकीर्ती करून जिज्ञासूंच्या मनात
तिच्याविषयी अढी निर्माण करण्याचा कट्टरवाद्यांचा अश्लाघ्य प्रयत्न !

५ अ. सनातनद्वेषाचा कंड शमवण्यासाठी तिच्यावर विविध आरोप करणे !

टीका

ही (सनातन) संघटना भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक गटांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाडणे आणि त्यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचे कार्य पुस्तके अन् तत्सम माध्यमे यांद्वारे करत आहे.

खंडण

अ. सनातन ही राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना असून समाजाला साधना सांगते. यामुळे अनेक संघटना, संस्था सनातनशी जोडल्या जात असतांना ती समाजात फूट पाडत असल्याचा आरोप हा बिनबुडाचा होय.

आ. सनातनच्या ग्रंथातील शास्त्रोक्त, सुलभ आणि वैज्ञानिक भाषेतील माहिती वाचून जिज्ञासू प्रभावित होत आहेत. एवढेच नव्हे, तर अनेक जिज्ञासूंनी ग्रंथ वाचून साधनेला आरंभही केला आहे.

इ. एप्रिल २०१७ पर्यंत सनातनच्या ३०० ग्रंथांच्या १५ भाषांत ६८ लाख ५१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत ! त्यामुळे अशा चैतन्यदायी ग्रंथांना नावे ठेवणे, हे बुद्धी भ्रष्ट झाल्याचे द्योतक !

५ आ. सनातनला आतंकवादी म्हणून रंगवण्याचा कट्टरवाद्यांचा कुटील डाव !

टीका

देशातील धर्मनिरपेक्ष व्यक्तींमध्ये दहशत निर्माण केल्यामुळे त्यांच्या २ अनुयायांना अटक झाली असून ते कारावासात आहेत.

खंडण

अ. या संशोधनबहाद्दरांनी जरा भारतीय कायद्यांचा अभ्यास करावा आणि मगच बोलावे ! कट्टरवाद्यांनो, हा तुमचा इस्लामी देश नव्हे, तर भारत आहे ! एखाद्याला गुन्हेगार ठरवण्यासाठी येथे न्यायालयात पुरावे सिद्ध व्हावे लागतात !

आ. दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि पानसरे हत्या प्रकरणी श्री. समीर गायकवाड यांना केवळ संशयावरून अटक झाली आहे.

इ. या प्रकारणाची प्रतिदिन सुनावणी होऊन प्रकरण निकालात लागावे, अशी सनातनची मागणी आहे; मात्र पोलीस यासंदर्भात टाळाटाळ करत आहेत !

ई. इकडून तिकडून लिंक गोळा करणार्याट या संशोधनबहाद्यरांना सनातनने जोरकसपणे मांडलेल्या या भूमिकांच्या लिंक्स कशा काय मिळत नाहीत ? यातच सर्व काही आले !

५ इ. (म्हणे) सनातनचा आश्रम बंद करण्याचा निकाल !

टीका

या संघटनेचे आश्रम बंद करण्याचा, तसेच उपक्रम बंद करण्याचा निकाल दिला असतांनाही तो कार्यान्वित न झाल्यामुळे भारतियांमध्येे, तसेच धार्मिक नसलेल्या सर्व बुद्धिजीवींमध्ये संताप निर्माण झाला आहे.

खंडण

अ. या टोळीने बुद्धी गहाण ठेवून संशोधन केले आहे, हेच यातून दिसून येते. सनातनचा कुठलाच आश्रम बंद करण्याचा कोणीही आदेश दिलेला नाही.

आ. इस्लामी देशात बसून भारतातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांची प्रतिमा मलीन करणार्या अशा कट्टरवादी इस्लामी संघटनांविषयी भारत शासनाने संशोधन करण्याची वेळ आली आहे.

६. हिंदु राष्ट्रासाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर
विद्वेषी टीका करणे, हा इस्लामी कट्टरवाद्यांच्या जिहादचाच एक भाग !

६ अ. संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ यांना परम आदरणीय असणारे परात्पर गुरु आठवले यांच्याविषयी कट्टरवाद्यांनी केलेला थयथयाट !

६ अ १. टीका

ती (परात्पर गुरु डॉ. आठवले) भारतातील एक तिरस्करणीय आणि अविश्वसनीय व्यक्ती आहे.

खंडण

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समाजाला साधना सांगून अनेकांचा उद्धार केला आहे. आतापर्यंत सनातनचे १ सहस्रहून अधिक साधक जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले असून ६८ साधक संतपदी विराजमान झाले आहेत.

आ. मोक्ष चैतन्य सात्त्विकता हे शब्द तरी इस्लामी कट्टरवाद्यांना ज्ञात आहेत का ?

इ. काफीर हिंदूंना जागृत करणारे, त्यांना संघटित करून चैतन्यदायी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले जिहाद्यांना तिरस्करणीयच वाटतात, यात आश्चर्य ते काय ?

६ अ २. टीका

एवढेच नव्हे, तर हिंदु धर्मातील वरिष्ठ लोकांनी त्यांना नाकारले असून हिंदूंमध्ये फूट पाडणारे आणि धार्मिक संप्रदायांमध्ये गोंधळ निर्माण करणारे म्हणून ते ओळखले जातात.

खंडण

अ. हिंदु धर्मातील वरिष्ठ कोण, कनिष्ठ कोण, हे इस्लामी राष्ट्रात बसून या कट्टरवाद्यांना कसे कळले ? संशोधन आणि अभ्यास या नावाखाली वैचारिक आतंकवाद प्रसारित करण्याचा हा कुटील डाव होय !

आ. कट्टर जिहादी टोळ्यांची पिलावळ भारतातही मोठ्या प्रमाणात आहे, तसेच त्यांना चुचकारणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, बुद्धीवादी यांचीही कमतरता नाही. त्यांना सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याविषयी पोटशूळ आहे. अशांना भारतात शेंबडे पोरही विचारत नाही, हे कट्टरवाद्यांनी लक्षात घ्यावे.

इ. इस्लामी कट्टरवाद्यांनी कितीही आगपाखड केली, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्भुत, अलौकिक कार्याची कीर्ती जगभर पसरून अनेक जीव त्यांना जोडले जाणार, हेच अंतीम सत्य आहे !

इस्लामी कट्टरवाद्यांनी लिहिलेल्या या पत्राविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी गांभीर्याने अभ्यास करणे आवश्यक ! भारतात कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांची माहिती काढून या कट्टरवादी संघटना त्यांची प्रतिमा मलीन करतात, तसेच त्यांच्यावर एकप्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ! भारतातील किती हिंदुत्वनिष्ठ संघटना इस्लामी राष्ट्रांतील सोडा, भारतातील कट्टरवादी संघटनांच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

इस्लामी राष्ट्रांतील नागरिकांना व्यक्तीगत साधना करण्याचेही स्वातंत्र्य नाही ! जे तसा प्रयत्न करतात, त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी तेथील कट्टरवादी संघटना किती खालच्या स्तराला जाऊन प्रयत्न करतात, हेच या पत्रावरून दिसून येते !

हे पत्र वरकरणी गोड भाषेत लिहिलेले असले, तरी तेथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार ती एकप्रकारची गर्भित धमकीच असते ! पत्र पाठवूनही साधना करणे सोडले नाही, तर इस्लामी कट्टरवादी त्यांचा क्रूर छळ आरंभतात ! एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही साधना करणार्या तेथील साधकांचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे !

जगभरातील जिहादी आतंकवादी संघटना या इस्लामी आहेत, हे सर्वज्ञात आहे. असे असतांना त्यांच्यापासून जगाला असलेला धोका न सांगणारे कट्टरतावादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मात्र अपकीर्त करतात, हे लक्षात घ्या !

इस्लामी राष्ट्रात इस्लामेतर उपासनेला तीव्र विरोध केला जातो; याउलट भारतात अन्य पंथियांचे उपासनास्वातंत्र्य जपण्यासाठी राजकीय पक्ष, पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी आदींमध्ये अहमिका लागते !

कुठे स्वत:च्या राष्ट्रात स्वपंथाव्यतिरिक्त होणार्या उपासनेला जागरूक राहून विरोध करणारे कट्टरतावादी, तर कुठे जगभरातील अन्य पंथीय भारतात येऊन त्यांच्याकडून हिंदूंचे धर्मांतर, तसेच हिंदूंवर विविध आघात होऊनही त्याविषयी अनभिज्ञ असलेले निद्रिस्त हिंदू !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment