सनातन संस्था, सनातन प्रभात आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर गरळओक करणा-या हिंदुद्वेष्ट्यांचा सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांच्याकडून सडेतोड प्रतिवाद

‘साम’ दूरचित्रवाहिनीवरील ‘आवाज महाराष्ट्राचा’ या
सदरातील ‘साध्वी सुटणार, कर्नल लटकणार !’ या विषयावरील चर्चासत्र

श्री. अभय वर्तक

मुंबई – श्री. अभय वर्तक हे ज्या संस्थेचे प्रतिनिधी आहेत, ती संघटनाच ‘आतंकवादी’ आहे. त्यांच्यातील अनेक लोकांवर आतंकवाद घडवल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. (सनातनवर आतंकवाद घडवल्याचा कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसतांना असे धादांत खोटे विधान करून सनातनची अपकीर्ती करणारे सनातनद्वेषी नवाब मलिक ! – संपादक) त्या संघटनेवर बंदी आणण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. (प्रत्यक्षात केंद्र शासनाने ही शिफारस पुराव्यांच्या अभावी नाकारली आहे, हे सत्यदेखील मलिक यांनी जाणून घ्यायला हवे ! – संपादक) पनवेल बॉम्बस्फोटप्रकरणी सनातनच्या साधकांना शिक्षा झालेली आहे. आताही तुमचे कार्यकर्ते अटकेत आहेत. गोव्यात तुम्ही बॉम्बस्फोट घडवला आहे. तुम्ही स्वतः आतंकवादी असून लोकांची दिशाभूल करू शकत नाही’, असे जावईशोध लावणारे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी सनातन संस्थेवर केला. ‘साम’ दूरचित्रवाहिनीवरील ‘आवाज महाराष्ट्राचा’ या सदरातील ‘साध्वी सुटणार, कर्नल लटकणार !’ या विषयावर २५ एप्रिल या दिवशी आयोजित चर्चासत्रात मलिक बरळत होते.(विषयाच्या माध्यमातूनच ‘साम’ वाहिनीने साध्वी आणि हिंदुत्व यांच्याप्रती असलेला द्वेष प्रकट केला आहे ! अशा वाहिन्या जनतेला योग्य दिशा कशी देणार ? – संपादक)

मलिक यांच्या आरोपांना वर्तक यांनी सडेतोड प्रतिवाद करतांना सांगितले, ‘‘तुमच्याकडे सनातन संस्था ‘आतंकवादी’ असल्याचा कोणता पुरावा आहे का ? राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बॉम्बस्फोट आणि भ्रष्टाचार यांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ‘आतंकवादी’ ठरतो का ?’’ या चर्चासत्रात भाजपचे प्रवक्ता विश्वास पाठक, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश खैरनार, अधिवक्ता असीम सरोदे आणि सूत्रसंचालक म्हणून ‘साम’ वाहिनीचे संपादक संजय आवटे हे उपस्थित होते.

 

श्री. अभय वर्तक यांनी साध्वी प्रज्ञासिंह आणि हिंदु राष्ट्र यांविषयी मांडलेली सडेतोड भूमिका

१. साध्वी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, कारागृहात त्यांचा अन्वेषण यंत्रणा आणि अन्वेषण अधिकारी यांनी अनन्वित छळ केला. त्यांना कारागृहात ‘ब्ल्यू फिल्म’ (अश्लील चित्रफीत) दाखवण्यात आली आणि बळजोरीने तोंडात मांस कोंबण्याचा प्रयत्न केला. त्या कर्करोगाने त्रस्त आहेत.

२. साध्वींना अटक केल्यावर त्यांच्या आवाजातील ‘ट्रान्सक्रिप्ट’ मोठमोठ्या वृत्तपत्रांनी छापली होती. ते आरोपपत्राला जोडलेच गेले नाही; कारण ते धादांत खोटे होते. ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, मेजर उपाध्याय आणि १२ जणांवर आरोप करण्यात आले. मुस्लिम आतंकवादावर पांघरुण घालण्यासाठी ‘भगवा आतंकवाद’ निर्माण करण्यात आला.

३. हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी कशाप्रकारे छळ केला जातो, हे स्वतः सनातन संस्थेने अनुभवले आहे. या देशात हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले जात असून त्याचे आम्ही साक्षीदार आहोत.

४. जर भूतानसारखा देश घटनेमध्ये दुरुस्ती करून ‘बौद्धराष्ट्र’ होऊ शकतो, तसे भारत ही १०० कोटी हिंदूंची भूमी असून तो घटनेमध्ये दुरुस्ती करून ‘हिंदु राष्ट्र’ का होऊ शकत नाही ?

 

ज्यांनी या तपासात चूक केली आहे, त्यांना शिक्षा व्हायला हवी ! – विश्वास पाठक

एका साध्वीला ९ वर्षे कारागृहात डांबून ठेवले, हा कट कारस्थानाचा भाग आहे. तत्कालिन काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ असे नाव दिले. महाराष्ट्र्राचे तत्कालिन गृहमंत्री आणि आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालिन प्रमुख यांची भूमिका संशयास्पद होती. ज्यांनी या तपासात चूक केली आहे, त्यांना शिक्षा व्हायला हवी. न्यायालयाने जो जामीन दिला आहे, तो सर्व पडताळणी करून दिला आहे. त्यामुळे आपण त्या निर्णयाचा मान राखायला हवा.

 

अधिवक्ता असीम सरोदे यांची सनातनद्वेष आणि हिंदुद्वेष याविषयीचा कंड शमवणारी वक्तव्ये

१. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) जामीन देण्यास आमची हरकत नाही’, असे सांगण्यामागे शासनाने हे आरोपी अन्य कटकारस्थानात सहभागी होणार नाहीत, असे म्हणायचे आहे का ? (स्वतः न्यायाधीश असल्यासारखे वागणारे सरोदे ! – संपादक) आता जामीन मिळाल्यानंतर जो विजयी उन्माद साजरा केला जात आहे किंवा जी वक्तव्ये केली जात आहेत, ते चुकीचे आहे. वारंवार असे लक्षात आले आहे की, अन्वेषण यंत्रणा या शासनधार्जिण्या वागत आलेल्या आहेत. (असे असतांना इतके वर्षे असीम सरोदे गप्प का होते? – संपादक)

२. सनातनने नेहमीच जातीय आणि धार्मिक तेढ अन् दुजाभाव निर्माण करणारे वक्तव्य सनातन प्रभातमधून केलेले आहे. ते घटनात्मक भाग मानत आपली कारस्थाने करत रहातात, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. (सनातन प्रभातने कायम राज्यघटनेचा आदर राखतच नेहमी लिखाण केलेले आहे. सनातन प्रभातमधून कोणतेही जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे लिखाण केलेले नाही, तर जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण जात्यंधांवर वेळोवेळी शास्त्राचा आधार घेऊन वैचारिक प्रहार केले आहेत. सनातन प्रभातमधून राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत करणारे लिखाण केले जाते. हे सत्य लिखाण सहन होत नसल्यामुळेच सरोदे यांचा जळफळाट होत असतो ! – संपादक) हिटलरच्या काळातही अशीच भूमिका घेण्यात आली होती आणि अशीच कार्यवाही झाली होती.

 

सुरेश खैरनार यांची सनातनद्वेषी आणि हिंदुद्वेषी मानसिकता दर्शवणारी वक्तव्ये

१. साध्वींचा छळ होत आहे, हे श्री. अभय वर्तक सांगत असलेल्या गोष्टींना कोणताही आधार नाही. हिंदुत्ववाद्यांकडून चालू असलेला हा अपप्रचार आहे. साध्वी आणि स्वामी असीमानंद यांनी साधूचे वेश परिधान करून देशाचे स्वातंत्र्य आणि घटना यांच्याशी दुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे. जर पथकाने केलेले अन्वेषण चुकीचे ठरवून जामीन दिला जात असेल, तर मग आज ३० सहस्र मुसलमान मुले कारागृहात आहेत. त्यांचा विचार का केला जात नाही ? त्यांच्याविषयी वर्तक यांना पुळका का नाही ? (खैरनार यांना धर्मांधांविषयी पुळका येत असल्यामुळेच ते साध्वींना मिळालेल्या जामिनामुळे व्यथित झाले आहेत ! – संपादक)

२. सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक हे हिंदुत्ववाद्यांचे प्रतिनिधी आहेत. सनातन संस्थेने आतापर्यंत ३ जणांचे बळी घेतले आहेत. (ही प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. सनातनने असे बळी घेतल्याचे कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने म्हटलेले नाही. असे असतांना सनातनवर असे धादांत खोटे आरोप करणा-यांविषयी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)

 

‘नथुराम गोडसे ‘हिंदु आतंकवादी’ आहेत ! – खैरनार

माझ्याकडे सनातन प्रभातचे अंक आहेत. यामध्ये मुस्लिमद्वेष, ख्रिश्चनद्वेष याच्या बातम्या असतात. शेतक-यांच्या आत्महत्या, पाणी, पाऊस, भूकंप आणि जगाच्या अन्य कोणत्याही बातम्या नसतात. फक्त हिंदु-मुस्लिम एवढेच असते. सनातन प्रभातचे अंक वाचून बघू शकता, ते ‘ऑनलाईन’ही उपलब्ध आहेत. अभय वर्तक हे सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांच्यापासून दिशाभूल करत आहेत. नथुराम गोडसे हे देशाचे पहिले हिंदु आतंकवादी आहेत, त्यांनी गांधींची हत्या केली.

 

गोडसे यांना ‘आतंकवादी’ म्हणणार नाही ! – श्री. अभय वर्तक

‘नथुराम गोडसे हा आतंकवादी होता’, हे वर्तक मान्य करतील का ?, असे सूत्रसंचालकांनी सांगितले. त्यावर श्री. वर्तक यांनी सांगितले की, खैरनार यांनी देशाची दिशाभूल केली आहे. साम्यवाद्यांनी देशाचे वाटोळे केलेले आहे. सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांची दिशा सुस्पष्ट आहे. आम्ही देशाला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. याच न्यायाने नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली. गोडसे यांनी न्यायालयात सांगितले होते की, ‘गांधींनी या देशाचे दोन तुकडे केले आहेत; म्हणून मी त्यांची हत्या केली.’ मी गोडसे यांना ‘आतंकवादी’ म्हणणार नाही.

 

आगपाखड करण्याचा प्रयत्न करणारे खैरनार यांना श्री. वर्तक यांचे सडेतोड प्रत्युत्तर

‘ज्या पद्धतीने अभय वर्तक हे हिंदुत्ववाद्यांची वकिली करत आहेत. त्यांना एका कार्यक्रमातून हाकलण्यात आले आहे’, असे खैरनार म्हणाले. यावर श्री. वर्तक यांनी त्यांना ‘तोंड सांभाळून बोला. आजचा विषय वेगळा आहे. सुरेश खैरनार कोण आहेत ?’, असे सांगितले. तेव्हा सूत्रसंचालकांनी खैरनार यांना सांगितले की, वर्तक यांना माझ्या वाहिनीवर येऊन त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. बाहेर कोठे काय झाले, ते येथे सांगत बसू नका. मुद्याचे बोला.

 

सनातन प्रभातविषयी सूत्रसंचालकाचा जळफळाट

सूत्रसंचालक आवटे यांनी चर्चासत्रात श्री. वर्तक यांचे बोलणे तोडत सांगितले, ‘‘अभिनव भारत संघटना, सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांमधून जे लिखाण केले जात आहे, ते काय आहे ? दाभोलकर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या अग्रलेखातून काय लिहिता ? ते चिथावणीखोर आहे. विवेकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही वारंवार केला आहे.’’ (सनातन प्रभातने कोणत्याही प्रकारचे चिथावणीखोर लिखाण केलेले नाही. एखाद्या लिखाणाचा चुकीचा अर्थ काढून सनातन प्रभातवर नाहक आगपाखड करणारे असे सूत्रसंचालक समाजासमोर सत्य कधीतरी मांडतील का ? – संपादक)

आवटे यांच्या या आरोपांवर वर्तक यांनी सांगितले, ‘‘सनातन प्रभातमधून आम्ही सांगतो की, आम्ही देशावर प्रेम करा. या देशात काही संघटना अशा आहेत की, ज्या विदेशी पैसे घेऊन देशाच्या एकसंधतेला धोका निर्माण करतात, नक्षलवाद्यांचे समर्थन करतात, त्यांच्याविषयी छापतो.’’

त्यावर सूत्रसंचालक आवटे यांनी उपहासाने सांगितले की, खैरनार तुम्ही सेवादलाची पत्रिका बंद करा आणि मुलांना सनातन प्रभात द्या. त्यात देशप्रेमाचे किती लिहिलेले आहे ते बघा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment