महाबळेश्‍वर येथील श्रीकृष्णामाईचे देवालय

क्षेत्र महाबळेश्‍वर येथे अति प्राचीन असे श्री महाबळेश्‍वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे. कामानिमित्ताने महाबळेश्‍वर येथे जाण्याचा योग आला असता श्री कृष्णामाईच्या दर्शनास गेल्यावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

तमिळनाडूमध्ये घडलेले भाविकतेचे दर्शन

तमिळनाडूमध्ये रहाणार्‍या लोकांनी अजूनही त्यांची परंपरा जपली आहे. येथील लोक खूप भाविक आहेत. ते आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे अगदी काटेकोरपणे पालन करतांना दिसतात.

कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिर !

कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे.

महादेवासमोर नंदी नसलेले त्रैलोक्यातील एकमेव श्री कपालेश्‍वर मंदिर

नाशिक हे जसे त्र्यंबकेश्‍वरमधील ज्योर्तिलिंगासाठी प्रसिद्ध आहे, तसेच ते अतीप्राचीन श्री कपालेश्‍वराच्या मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक येथील श्री कपालेश्‍वर महादेवाची महती आणि माहिती जाणून घेऊ.

शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले आणि प्रभु श्री रामचंद्रांच्या हस्ते स्थापन झालेले राक्षसभुवन येथील श्री शनिमंदिर !

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे असलेल्या श्री शनि मंदिरात पौष शुक्ल पक्ष अष्टमीला सायंकाळी शनिमहाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने या मंदिराची माहिती पुढे देत आहोत.

धनुषकोडी

भारताच्या दक्षिण-पूर्व शेषटोकावरील हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे धनुषकोडी ! हे ठिकाण पवित्र रामसेतूचे उगमस्थान आहे. गेल्या ५० वर्षांपासून हिंदूंच्या या पवित्र तीर्थस्थानाची स्थिती एका उद्ध्वस्त नगरासारखी झाली आहे. २२ डिसेंबर १९६४ या दिवशी हे नगर एका चक्रीवादळाने उद्ध्वस्त केले.

कोकणची काशी : श्री देव कुणकेश्‍वर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्‍वराला कोकणची काशी असे संबोधतात. कुणकेश्‍वर येथे १०७ शिवलिंगे आहेत. कोकणातील इतर प्रसिद्ध अशा भगवान शंकरांच्या स्थानांत याची गणना होते.

धायरी, पुणे येथील स्वयंभू देवस्थान श्री धारेश्वर !

धायरी गावातील धारेश्वराचं मंदिर हे अनुभवण्यासारखेच आहे. गाभार्‍यातील स्वयंभू प्रसन्न शिवलिंग पहातांना हात नकळत जोडले जातात. चैत्र वद्य चतुर्थीला श्री धारेश्वराची मोठी यात्रा भरते.

भक्तांच्या मनात भाव आणि भक्ती निर्माण करणारा श्री चिंतामणीचा महिमा !

यवतमाळपासून २३ कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र कळंब गावातील प्रसिद्ध श्री चिंतामणि मंदिर हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

थेऊर येथे स्थापन केलेला चिंतामणि (अष्टविनायकांपैकी एक गणपति) !

महर्षि गृत्समदांनी श्री गणेशाची स्थापना केली. श्री क्षेत्र थेऊर (जिल्हा पुणे) येथे स्थापलेल्या श्री गणेशाचे नावही चिंतामणि हेच आहे. हे क्षेत्र आज अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध क्षेत्र आहे.