त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग

Article also available in :

 

श्री त्र्यंबकेश्‍वर, नाशिक

‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असणार्‍या नाशिकजवळ ‘त्र्यंंबकेश्‍वर’ हे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगावर ३ उंचवटे असून ते ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक आहेत. नारायण-नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध यांसारखे विधी येथे शीघ्र फलदायी होतात. येथे संत निवृत्तीनाथांची समाधी आहे.

१. त्र्यंबकेश्‍वर देवालयाच्या गाभार्‍यात निर्माण होणार्‍या ऊर्जा, चैतन्य सहन करण्याची ताकद ज्यांच्या शरिरात आहे, त्याच माणसांना गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. याचे शास्त्रीय कारण असे की, ज्वालामुखीतून जसा ऊर्जेचा उद्रेक होतो आणि त्यातून गॅमा, अल्फा, क्ष किरण, तसेच इतर धन, ऋण या बारीक विद्युत कणांचा वर्षाव होतो, तसाच ज्योतिर्लिंगातून होतो. त्र्यंबकेश्‍वरला हे सारे असे घडते; म्हणूनच ‘आतापर्यंत काही वेळा तीन दिवस, सात दिवस हे त्र्यंबकेश्‍वराचे मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे’, असे तेथील स्थानिक वयस्कर पुरोहितांनी सांगितले.

२. प्राचीन काळी भारतात ज्या ज्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्या त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग निर्माण केली गेली, असे जाणकारांनी सांगितले. ठराविक दिवशी, ठराविक प्रहरात निसर्गतः जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तर तेथील चैतन्य, ऊर्जा, स्पंदने ही नेहमीच्या वेळी असतात, त्यापेक्षा अधिक तापमान निर्माण करणारी असतात. ही स्थिती त्र्यंबकेश्‍वर या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आढळते.

३. ज्या ज्या वेळी पृथ्वीतलावर, विशेषत: भारतावर वैश्‍विक ऊर्जेशी निगडित वातावरणीय प्रकोप झाले (उदा. भारत-चीन युद्ध, पाकसमवेतचे युद्ध), त्या त्या वेळी किमान १ दिवस हे देवालय बंद ठेवावे लागले होते.

४. त्र्यंबकेश्‍वर हे शिवयोगयुक्त प्राचीन शिवयोगात वर्णन केलेले तीर्थस्थळ आहे. येथे ब्रह्मा, विष्णु आणि महेश युक्त जललिंग आहे.

(संदर्भ : ‘विश्‍वचैतन्याचे विज्ञान’, पू. डॉ. रघुनाथ शुक्ल, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा)

Leave a Comment