सनातन संस्था उत्तम रितीने धर्मकार्य करत आहे ! – श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी

सनातन पंचांग दाखवतांना श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी

चिक्कमगळुरू (कर्नाटक) – श्री आदिशंकराचार्य शारदा लक्ष्मी नरसिंह पीठ, हरिहरपूरचे पीठाधिपति श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी यांची ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी महास्वामीजींना सनातनच्या ग्रंथांविषयी, पंचांगाविषयी माहिती देण्यात आली. अत्यंत आत्मियतेने त्यांनी सर्व समजून घेतले आणि ‘सनातन संस्था उत्तम रितीने धर्मकार्य करत आहे’, असे गौरवोद्गार काढले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सौ. शारदा योगीश, श्रीमती ललितम्मा तिम्मप्पय्या आणि धर्मप्रेमी डॉ. योगीश हे उपस्थित होते. सनातनच्या चैतन्यदायी ग्रंथांचा लाभ समाजातील अधिकाधिक लोकांना व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment