मध्‍यप्रदेशातील डॉ. विष्‍णु जोबनपुत्र यांची सपत्नीक रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट !

मध्‍यप्रदेशमधील विदिशा जिल्‍ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्‍गुरु सेवा संघ ट्रस्‍ट’चे विश्‍वस्‍त आणि सद़्‍गुरु संकल्‍प नेत्र चिकित्‍सालयाचे संचालक डॉ. विष्‍णु जोबनपुत्र अन् त्‍यांच्‍या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट दिली.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’…….

सनातन संस्था शिकवत असलेले स्वभावदोष निर्मूलन शिकून कृतीत आणा ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

अधिवक्ता कृष्णमूर्ती धर्मनिष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांचा अखंड नामजप चालू असतो. प्रवासात ते प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतात.त्यांच्यावर आक्रमण झाले तेव्हा ‘परमपूज्य गुरुदेवांनी माझे रक्षण केले आहे. मला अजून पुष्कळ कार्य करायचे आहे’, असे त्यांनी सांगितले.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘मी भगवंताच्‍या दारी आलो आहे’, असे वाटले. माझे मन शुद्ध आणि प्रसन्‍न झाले.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रमाच्‍या आत प्रवेश करतांना ‘तीर्थ अंगावर शिंपडून पवित्र होणे’, ही कृतीही मला पुष्‍कळ आनंद देऊन गेली.’

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमात आल्यानंतर मला ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात जाणून घेण्याचे सौभाग्य लाभले. ‘आपल्या दैनंदिन जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करायचे ?’, याविषयी ज्ञान मिळाले.

पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके यांची गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

मु.पो. राख, तालुका पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके आणि त्यांची पत्नी सौ. संजना मांडके यांनी ५ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. संदीप मांडके हे कीर्तनातून सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगतात.

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. हितेश जानी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट !

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी मुख्यध्यापक तथा पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. हितेश जानी यांनी ३१ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर दिलेले अभिप्राय

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या महाराष्ट्रातील भक्तांचे ८ मार्च या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी त्यांनी आश्रमातील अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांचे, तसेच आध्यात्मिक संशोधनाचे कार्य जाणून घेतले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

‘सनातन धर्म शिकवण्‍यासाठी संस्‍थेद्वारे अत्‍याधुनिक पद्धतींचा उपयोग केला जात आहे’, हे पाहून पुष्‍कळ चांगले वाटले. माहितीजालाच्‍या (इंटरनेटच्‍या) काळात सनातन धर्माचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत करता येऊ शकतो.