दैनिक गोमन्तकचे संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

गोव्यातील दैनिक गोमन्तकचे निवासी संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांनी २१ फेब्रुवारीला सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिली.

हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

मिरज येथील धर्माभिमानी अधिवक्त्यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

मिरज येथील अधिवक्ता श्री. किरण जाबशेट्टी, अधिवक्ता श्री. अण्णासाहेब जाधव, अधिवक्ता श्री. राजेंद्र शिरसाट आणि अधिवक्ता श्री. सी.ए. पाटील या सर्व धर्माभिमानी अधिवक्त्यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

प्रख्यात संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

सनातन ही एक सर्वोत्तम संस्था आहे, असा अभिप्राय श्री. मनोहर नाईक यांनी आश्रम पाहिल्यानंतर व्यक्त केला. श्री. समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर सनातन संमोहनाद्वारे मानवी बॉम्ब बनवते, असा खोटा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांनी केला होता. हा आरोप संमोहनतज्ञ श्री. मनोहर नाईक यांनी खोडून काढला.

मी आता सनातनचाच झालो आहे ! – वेदमूर्ती श्री. नंदकुमार रहाणे

मी आता सनातनचाच झालो आहे. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. अनेक दिवसांपासून आश्रमात यायची इच्छा पूर्ण झाली, असे भावपूर्ण उद्गार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुरसुंगी येथील वेदमूर्ती, ग्रामोपाध्याय श्री. नंदकुमार रहाणे यांनी काढले.

प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते अधिवक्ता मारुति जडियावर यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते अधिवक्ता मारुति जडियावर यांनी सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. गोवा येथे चालू असलेल्या आंतराराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात सहभागी होण्यासाठी ते आले होते.

धर्माच्या पायावर उभे असलेले सनातन संस्थेचे कार्य वाढेल ! – स्वामी गंभीरानंद महाराज

आजच्या युवा पिढीसमोर हिंदु धर्माचे हे ज्ञान वैज्ञानिक भाषेत पोहोचवणे आवश्यक आहे. हेच कार्य सनातन संस्था प्रामाणिकपणाने करत आहे. मुळात संस्थेचे कार्य सनातन धर्माच्या पायावर उभे असल्याने ते वाढेल आणि टिकेल. तुम्ही आमचेच कार्य करत आहात, असे प्रतिपादन भिवंडी येथील स्वामी गंभीरानंद महाराज यांनी केले.

महान भारतीय संस्कृतीचे आचरण सर्वांनी करायला हवे ! – श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी

इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीमुळे १८० वर्षांपूर्वी असणारा सुजलाम् सुफलाम् भारत आज विपत्तीमध्ये आहे.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय !

मला प्रांजळपणे मान्य करावेसे वाटते की, ही संस्था हिंदु समाजामध्ये जनजागृती करणे, तसेच हिंदु धर्मातील चांगल्या आणि पवित्र गोष्टींची जाणीवपूर्वक जपणूक करतांना दिसते. पावित्र्य आणि शुचिर्भूतता यांचा सुरेख संगमच या भेटीत मला आढळून आला.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय !

आश्रमातील प्रत्येक क्षणाचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचा येथे विचार होतो आणि ते आनंदाने आचरणात आणणार्‍या साधकांना पाहून मला पुष्कळ समाधान वाटले.