
रामनाथी (गोवा) – हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. महावीर श्रीश्रीमाळ यांनी आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांविषयी कार्याचा परिचय करून दिला. या वेळी श्री. सरदेसाई म्हणाले, सनातनचे कार्य अतिशय चांगले आहे. या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील.
श्री. अनुप सरदेसाई यांचा परिचय
गोवा येथील श्री. अनुप सरदेसाई हे सरदेसाई ग्रूपचे प्रमुख आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांनी अभियंता म्हणून सेवा बजावली आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी या लेखनास आरंभ केला. गेली ५ वर्षे देशातील धार्मिकदृष्ट्या राजकीय समस्यांचा त्यांनी प्रदीर्घ अभ्यास केला आहे. त्यांनी नथुराम गोडसे-स्टोरी ऑफ अॅन असॅसिन (नथुराम गोडसे-वधाची कथा) आणि महात्माज ब्लंडर्स-व्हाय डिड गोडसे किल गांधी ? (महात्म्याची घोडचूक – गोडसे यांनी गांधींना का मारले ?) ही पुस्तके लिहून पं. नथुराम गोडसे यांची सकारात्मक बाजू जगासमोर आणली आहे.
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !