दैनिक सनातन प्रभातचा अंक पहातांना श्री. संजय राऊत. बाजूला सनातनचे श्री. चेतन राजहंस
रामनाथी (गोवा) – शिवसेनेचे नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार श्री. संजय राऊत यांनी १२ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी आश्रमात चाललेल्या राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन या कार्याविषयी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी त्यांना अवगत केले. या वेळी श्री. राऊत यांनी दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयालाही आवर्जून भेट दिली. आश्रम पाहून श्री. राऊत म्हणाले, आश्रम अतिशय सुंदर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुशिक्षित साधक येथे राहून सेवा करतात, हे पाहून चांगले वाटले. पुढच्या वेळी मी पुन्हा एकदा सहकुटुंब आश्रमाला भेट देईन, म्हणजे माझ्या मुलांनाही येथे नवीन शिकायला मिळेल. मी सनातन प्रभातचे नियमित वाचन करतो.

कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !