मी आता सनातनचाच झालो आहे ! – वेदमूर्ती श्री. नंदकुमार रहाणे

vedmurti_rahane_devad_bhet

वेदमूर्ती श्री. नंदकुमार रहाणे (डावीकडून दुसरे)
यांना सनातन प्रभातची माहिती सांगतांना श्री. आगवेकर

वेदमूर्ती, ग्रामोपाध्याय श्री. नंदकुमार रहाणे यांची देवद आश्रमाला भेट 

      पनवेल – मी आता सनातनचाच झालो आहे. प्रती २ मासांनी मी आश्रमात येईन. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. अनेक दिवसांपासून आश्रमात यायची इच्छा पूर्ण झाली, असे भावपूर्ण उद्गार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुरसुंगी येथील वेदमूर्ती, ग्रामोपाध्याय श्री. नंदकुमार रहाणे यांनी काढले. त्यांनी सनातन संस्थेच्या देवद, पनवेल येथील आश्रमाला २९ ऑक्टोबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
     ते पुढे म्हणाले, भारताची रास धनु आहे. जानेवारी २०१७ मध्ये शनि धनुराशीत प्रवेश करत असल्याने त्यानंतरची अडीच वर्षे हिंदु जनजागृती समितीकडे अनेक लोक आकर्षित होतील आणि कार्यभाग पूर्णत्वास जाईल. या वेळी आश्रमात सेवा करणारे साधक श्री. विनायक आगवेकर यांनी त्यांना आश्रमातील विविध विभागांची माहिती देऊन संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. आश्रमदर्शन केल्यावर ते म्हणाले आश्रमातील साधकांच्या चेहर्‍यावर साधनेचे तेज जाणवते. या वेळी त्यांनी आश्रमातील रचनेविषयी काही सूचना केल्या. त्यांना अध्यात्म विश्‍वविद्यालय हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला, तसेच अध्यात्म विश्‍वविद्यालयाची माहिती दिली.
क्षणचित्रे – १. वेदमूर्ती श्री. रहाणे स्वत:च्या घरात धर्मशिक्षणाचे फ्लेक्स फलक लावणार आहेत. त्यांनी सनातननिर्मित ग्रंथ आणि उत्पादने यांची मागणी या वेळी केली.
२. त्यांनी ज्योतिषशास्त्र या विषयावरील संशोधनाच्या कार्यात सनातनला साहाय्य करण्यास होकार दिला आहे.
३. पुढील वेळी आश्रमात आल्यावर आश्रमाच्या दृष्टीने वास्तूशास्त्राच्या संदर्भात माहिती सांगेन, असेही त्यांनी या वेळी सांगितले.