मिरज येथील धर्माभिमानी अधिवक्त्यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

Adhivakta_miraj

डावीकडून मिरज येथील अधिवक्ता किरण जाबशेट्टी, अधिवक्ता अण्णासाहेब जाधव, अधिवक्ता राजेंद्र शिरसाट, अधिवक्तासी.ए. पाटील आणि पाठीमागे सनातनचे श्री. किरण पोळ यांना सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती सांगतांना सनातनचे साधक श्री. प्रकाश जोशी

 रामनाथी (गोवा) – मिरज येथील अधिवक्ता श्री. किरण जाबशेट्टी, अधिवक्ता श्री. अण्णासाहेब जाधव, अधिवक्ता श्री. राजेंद्र शिरसाट आणि अधिवक्ता श्री. सी.ए. पाटील या सर्व धर्माभिमानी अधिवक्त्यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. प्रकाश जोशी यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म याविषयीचे कार्य आणि आध्यात्मिक संशोधन यांविषयी अवगत केले. 
 
     आश्रम पहातांना त्यांनी जिज्ञासेने पाहिला. सात्त्विकतेमुळे झालेले आश्रमातील पालट पाहून ते म्हणाले, “एरव्ही आपल्या हे लक्षात आलेच नसते. हे सांगायला सूक्ष्मातील जाणणारे कोणीतरी लागते. तुम्हाला (सनातनच्या साधकांना) हे संतांमुळे कळले, म्हणून आज आम्हाला कळले.” सूक्ष्म प्रदर्शनातील वस्तू पहातांना दोघांनी सूक्ष्मातील त्यांना त्यांच्या जीवनात आलेल्या अनुभूतीही सांगितल्या. पूर्ण आश्रम पाहून अतिशय चांगले वाटल्याचे त्यांनी सांगितले. एका विभागातील साधकांना उद्देशून ते म्हणाले, “तुमची ही सेवा आम्ही करू शकत नाही. न्यायालयीन लढ्याचा भाग आम्ही सांभाळू.”  
 
     पू. सौरभ जोशींचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण म्हणाले, “आमचे भाग्य म्हणून आम्हाला त्यांचे दर्शन झाले.” त्यांच्या दर्शनाच्या वेळी सर्वांचा भाव जागृत झाला. अधिवक्त्यामध्ये भाव जागृत झाल्यामुळे पू. सौरभदादाही त्यांना हसून उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते. त्यामुळे अधिवक्त्यांची जिज्ञासा निर्माण होऊन त्यांनी पू. सौरभदादांचा पूर्ण जीवनप्रवास जाणून घेतला.