आश्रमदर्शन करतांना उजवीकडून दुसरे संमोहनतज्ञ श्री. मनोहर नाईक
रामनाथी – गोरेगाव, मुंबई येथील प्रख्यात संमोहनतज्ञ श्री. मनोहर नाईक यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचे नातेवाईक आणि अन्य सहकारी उपस्थित होते. सनातन ही एक सर्वोत्तम संस्था आहे, असा अभिप्राय श्री. मनोहर नाईक यांनी आश्रम पाहिल्यानंतर व्यक्त केला.कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर सनातन संमोहनाद्वारे मानवी बॉम्ब बनवते, असा खोटा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांनी केला होता. हा आरोप संमोहनतज्ञ श्री. मनोहर नाईक यांनी खोडून काढला. त्यांनी ठामपणे प्रसिद्धीमाध्यमांसमोर सत्य मांडले; तसेच शाम मानव यांना उघड चर्चेचे आव्हान देऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचा खोटारडेपणा सर्वांसमोर उघड केला. संमोहनाद्वारे अनैतिक कृत्ये करवून घेता येत नाहीत, तसेच केलेले कृत्य मानवाच्या स्मृतीतून पुसून टाकता येत नाही, असे स्पष्टपणे श्री. मनोहर नाईक यांनी सांगितले होते.

कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !