मूळचे सांगली येथील आणि आता गोवा येथे स्थित झालेले पू. सदाशिव नारायण परांजपे (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
संत झाल्यानंतरही सतत सेवारत रहाणा-या पू. सदाशिव नारायण परांजपे यांचा साधनाप्रवास आपण पाहूया.
संत झाल्यानंतरही सतत सेवारत रहाणा-या पू. सदाशिव नारायण परांजपे यांचा साधनाप्रवास आपण पाहूया.
‘काशी क्षेत्राहून जवभर सरस असणारे, मनुष्याला ऐहिक सुख आणि मुक्ती देणारे करवीर क्षेत्र इ.स. पूर्व ५ व्या किंवा ६ व्या शतकातील आहे’, असे मानले जाते. श्री महालक्ष्मीची मूर्ती ज्या हिरकखंडमिश्रित रत्नशिलेची बनवली आहे, त्यावरूनही या देवालयाची प्राचीनता सिद्ध होते.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील २० वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने व्यापक स्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे.
धुळे येथील आई एकविरादेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे उद्घाटन मंदिराचे मुख्य विश्वस्त श्री. सोमनाथजी गुरव आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !
सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !
‘सूक्ष्मातून शरिराच्या बाहेर जाऊन परत आत येऊ शकतो’, असा एकही अवतारी जीव सध्या या पृथ्वीवर नाही. गुरुदेव डॉ. आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) हेच असे एकमेव आहेत’, असे मला श्री कामाक्षीदेवी सांगत आहे.
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान आणि सूक्ष्म चित्रे हे सनातनच्या ग्रंथांचे मुख्य वैशिष्ट्य असून ते अध्यात्माची शिकवण देणारे आहेत. यांचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले.
एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची एका अधिकारी संतांशी भेट झाली. त्यांची साधना एवढी आहे की, ‘अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ सतत या संतांच्या समवेत सूक्ष्मातून असतात’, असे त्यांनी सांगितले.
आपण ज्या हिंदु धर्मात जन्मलो, त्या धर्मात अमूल्य असे ज्ञान आहे. आपण सर्वजण मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी सकाळी उठल्यापासून पाश्चात्त्यांच्या अंधानुकरण करण्यातच धन्यता मानतो. आज बहुतांश जणांकडे पैसा असूनही मन:शांती नाही, अशी स्थिती आहे.