अखिल मानवजातीला अध्यात्मजगताची नावीन्यपूर्ण ओळख करून देणार्या सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !
सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !
सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !
नुकताच नालासोपारा प्रकरणामध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे श्री. वैभव राऊत यांना जामीन मिळाला आहे. दैनिक लोकसत्ताने श्री. वैभव राऊत यांना जामीन मिळाल्याच्या बातमीमध्ये त्यांचा ‘सनातनचे कथित सदस्य’ असा उल्लेख केला आहे; मात्र वैभव राऊत यांच्या छायाचित्राच्या जागी हेतूतः सनातन संस्थेचे अधिकृत राष्ट्र्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे छायाचित्र वापरले आहे.
‘सध्या अनेक साधकांना अनिष्ट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२३ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.
देवरुख येथे श्रीमती पानवळकरआजी यांच्या रहात्या घरी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांना व्यष्टी संत घोषित करून सर्वांना आनंदवार्ता दिली.
‘जागतिक आरोग्य संघटने’ने दावा केला आहे की, जगभरात ‘कोरोना’ महामारीपेक्षाही ७ पटींनी अधिक घातक अशी ‘डिसीझ एक्स’ नावाची महामारी येणार आहे. त्यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ही महामारी जगावर केव्हाही घाला घालू शकते.
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक उत्पादनांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्ध आहेत. साबण, उदबत्ती, त्रिफळा चूर्ण, दंतमंजन, उटणे, अत्तर, कापूर, कुंकू, अष्टगंध इत्यादी सात्त्विक उत्पादने बाहेरून बनवून घेतली जातात आणि त्यांची बांधणी (पॅकिंग) देवद आश्रमात केली जाते.
आपत्काळात रुग्णाच्या वेदना आणि आजार न्यून करण्यासाठी बिंदूदाबन शिकून घेणे आवश्यक आहे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने नवे पारगाव येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने रांझे गाव, भोर (पुणे) येथील ‘क्राफ्ट पावरकॉन इंडिया लिमिटेड’ या कंपनीमध्ये ‘गणेशोत्सवाचे अध्यात्मशास्त्र आणि साधनेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले !
‘ब्राह्मण सभा इस्लामपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या एका समारंभात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी म्हणून सनातनच्या संत पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७६ वर्षे) यांनाही सन्मानित करण्यात आले.
प्रत्येक मनुष्याला आंतरिक सुख आणि शांती हवी असते. ही सुख-शांती मिळवण्यासाठी तो सकाळपासून रात्रीपर्यंत सतत कार्यरत असतो. कधीही न संपणार्या सुखाला ‘आनंद’, असे म्हणतात.