
नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) – ‘येणार्या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्ध होतीलच असे नाही’, असे विविध द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. अशा आपत्काळात रुग्णाच्या वेदना आणि आजार न्यून करण्यासाठी बिंदूदाबन शिकून घेणे आवश्यक आहे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने नवे पारगाव येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्यात आले. याचा लाभ अनेक साधक शिबिरार्थी आणि रुग्ण यांनी घेतला. या शिबिराला सनातनच्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थिती सर्व दिवस लाभली. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गोपचार तज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना चेहरा, डोके, कान आणि पाठ यांवरील बिंदूदाबनाच्या पद्धती, शरिरातील वात काढण्याची प्रक्रिया शिकवली. पाठीच्या मणक्याचे आणि गुडघ्याचे आजार असणार्या रुग्णांची पडताळणी करण्यात आली. काही औषधे घरीच कशी सिद्ध करावी ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !