ब्राह्मण संघाच्या वतीने संत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांचा ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे सन्मान !

पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – ‘ब्राह्मण सभा इस्लामपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या एका समारंभात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी म्हणून संत पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७६ वर्षे) यांनाही सन्मानित करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पू. (श्रीमती) मुंगळे या प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने त्यांचा मुलगा श्री. संजय मुंगळे यांनी गौरवचिन्ह स्वीकारले. डॉ. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते गौरवचिन्ह देण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. संजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वागत आणि प्रास्ताविक श्री. वैभव उरुणकर यांनी केले. वाळवा तालुका ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री. अवधूत कुलकर्णी, प्राचार्या दीपा देशपांडे यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. अंजना मालकेर यांनी सूत्रसंचालन केले, तर डी.एन्. कुलकर्णी यांनी आभार मानले.

पू. वैशाली (माहेरचे नाव मंगल) मुंगळे यांना मिळालेले गौरवचिन्ह

हा सन्मान स्वीकारल्यावर पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे म्हणाल्या, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, सद्गुरु आणि श्रीराम यांच्या कृपेमुळेच माझा हा सन्मान होत आहे. त्यांच्या कृपेमुळेच मला हे सर्व मिळत आहे.’’

सनातन संस्थेने पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांना संत घोषित करून त्यांची गुणवैशिष्ट्ये समाजासमोर आणली ! – शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), देवद, पनवेल

पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांना सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी ७ जुलै २०२३ या दिवशी संतपद गाठल्याचे घोषित करून त्यांचा सन्मान केला. या संदर्भातील सविस्तर वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. यानंतर हे वृत्त वाचून समाजातील लोकांकडूनही पू. (श्रीमती) मुंगळे यांचा सन्मान करण्यात आला. काही ब्राह्मण सभेच्या महिला त्यांना येऊन भेटल्या आणि त्यांचा सन्मान केला. ‘रेडिओ शुगर’ या ‘एफ्.एम्.’ वाहिनीवरून पू. (श्रीमती) मुंगळे यांच्या साधनाप्रवासाची मुलाखत घेण्यात आली.

सनातन संस्थेने प्रथम त्यांना संत असल्याचे ओळखले. यानंतर समाजातील अन्य लोक, संस्था यांनाही या गोष्टी लक्षात येऊन त्यांनीही पू. (श्रीमती) मुंगळे यांच्या कार्याचा गौरव केला. सनातन संस्था अध्यात्माचा प्रसार करून समाजात साधनेचे बीज निर्माण करून सर्व समाजाला साधना करण्यास शिकवते आणि साधना करून घेते. यानंतर साधनेच्या पुढच्या टप्प्याला कसे जायचे ? तेही शिकवते. पू. (श्रीमती) मुंगळेआजी यांच्या उदाहरणावरून याची प्रचिती येते आणि समाजातूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे लक्षात येते.

Leave a Comment