सात्त्विक उत्‍पादनांच्‍या संदर्भातील सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्‍यकता !

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवेची सुवर्णसंधी !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सात्त्विक उत्‍पादनांच्‍या संदर्भात मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्‍ध आहेत. साबण, उदबत्ती, त्रिफळा चूर्ण, दंतमंजन, उटणे, अत्तर, कापूर, कुंकू, अष्‍टगंध इत्‍यादी सात्त्विक उत्‍पादने बाहेरून बनवून घेतली जातात आणि त्‍यांची बांधणी (पॅकिंग) देवद आश्रमात केली जाते. ‘येणार्‍या साहित्‍याचे वजन करणे, खोकी, तसेच पोती उचलणे, पोत्‍यांचे वजन करणे, साहित्‍याची ने-आण करणे’ इत्‍यादी सेवांसाठी शारीरिक क्षमता असलेल्‍या किंवा या संदर्भातील संगणकीय सेवा करणार्‍या साधकांची आवश्‍यकता आहे, तसेच ‘सर्व उत्‍पादनांचा अभ्‍यास करणे, उत्‍पादनांची गुणवत्ता पडताळणे, उत्‍पादन प्रक्रियेतील अडचणी सोडवणे’ इत्‍यादी सेवांसाठी या विषयातील जाणकार साधकांची आवश्‍यकता आहे.

या सेवा करू इच्‍छिणारे साधक आवश्‍यकतेप्रमाणे देवद आश्रमात येऊ शकतात. साधक पूर्णवेळ आश्रमात राहून अथवा आश्रमात येऊन-जाऊनही ही सेवा करू शकतात.

सेवा करण्‍यास इच्‍छुक असलेल्‍या साधकांनी याविषयी जिल्‍हासेवकांना कळवावे. जिल्‍हासेवकांनी पुढे दिलेल्‍या सारणीनुसार माहिती पाठवावी.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्‍यश्री सावंत (७०५८८८५६१०)

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्‍यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा – ४०३४०१.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त, सनातन संस्‍था. (३०.८.२०२३)

Leave a Comment