साधकांना सूचना

१. दत्ताचा नामजप करणे
‘सध्या अनेक साधकांना अनिष्ट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२३ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा. नामजप sanatan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
नामजपासाठीची लिंक – https://www.sanatan.org/mr/a/824.html
जे साधक स्वतःला होत असलेला अनिष्ट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी आध्यात्मिक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायांच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप न्यूनतम १ घंटा करावा. दत्ताचा नामजप करतांना हातांच्या पाचही बोटांची टोके जुळवून अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र यांच्या ठिकाणी न्यास करावा.
जे साधक उपाय करत नाहीत, त्यांनी वैयक्तिक आवरणे, स्नान, स्वच्छता-सेवा आदींच्या वेळी दत्ताचा नामजप न्यूनतम १ घंटा होईल, असे पहावे; मात्र पूर्वजांचा त्रास जाणवल्यास त्यांनीही बसून अन् मुद्रा करून दत्ताचा नामजप करावा.
२. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दिवसभरात मधेमधे दत्ताला प्रार्थना करावी.
३. ज्या साधकांना शक्य असेल, त्यांनी पितृपक्षात श्राद्धविधी अवश्य करावा.
असे केल्याने पूर्वजांचे त्रास तर दूर होतीलच, त्यासह साधनेसाठी त्यांचा आशीर्वादही मिळेल.’
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...