छत्तीसगड येथील राजीम कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. बालकदासजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी येथे राजीम कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माघ पौर्णिमा ते महाशिवरात्र या काळात भरणार्या या कुंभमेळ्याच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.