
पर्वरी – सनातन संस्थेच्या पर्वरी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मंत्री खंवटे यांचा सत्कार केला. या वेळी ते म्हणाले, ‘‘आपण आपली ओळख निर्माण करायला अल्प पडतो. कुणीतरी ‘नेरेटीव्ह’ (कथानक) करतो आणि ते राबवतो. सनातन संस्थेने फोंडा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित केल्यामुळे तेथील विविध प्रदर्शनांत मला स्वतःला अनेक ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळाल्या. आम्ही संघटित राहिलो, तर बरेच काही करू शकतो. आपण देवाकडे थेट बोलू शकत नाही. त्यासाठी गुरूंची आवश्यकता भासते. आपला पहिला गुरु आई असते. त्यानंतर वेगवेगळ्या रूपांत ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आमच्यावर पाश्चात्त्य संस्कृतीचा मोठा पगडा पडला आहे, तर विदेशी लोक आमच्या संस्कृतीकडे आकृष्ट होऊ लागले आहेत; म्हणूनच भावी पिढीवर मोठे दायित्व येणार आहे. त्यासाठी सनातन संस्थेच्या विचारांनुसार मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. मी सदैव तुमच्या (सनातन संस्थेच्या साधकांच्या) समवेत असेन. गुरुपौर्णिमेनिमित्त सनातन संस्थेला शुभेच्छा !
क्षणचित्रे
१. पर्वरी येथे गोवा राज्य संघचालक श्री. राजेंद्र भोबे यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश प्रभु यांनी केला. भाजपचे राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आले. त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्याशी चर्चा केली.

२. मडगाव येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि नावेलीचे भाजपचे आमदार श्री. उल्हास तुयेंकर उपस्थित होते.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !