
मुंबई (वार्ता.) – सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे नुकतेच सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित करण्यात आलेला शतचंडीयज्ञ आणि महाधन्वंतरि याग यांचा प्रसाद सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांना दिला.
या वेळी अभय वर्तक यांनी अधिवक्ता राहुल नार्वेकर यांना श्री बालाजीची चांदीची मूर्ती आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे संक्षिप्त चरित्र’ हा ग्रंथ भेट दिला. या वेळी भाजपचे आमदार महेश लांडगे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !