पणजी, ९ जुलै – फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणात मे महिन्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शंखनाद महोत्सव आयोजन समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजन समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री चेतन राजहंस, रमेश शिंदे, नारायण नाडकर्णी, धनंजय हर्षे आणि मनोज गावकर यांची उपस्थिती होती.

या भेटीत शिष्टमंडळाने महोत्सवाच्या आयोजनासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सनातन संस्था पुढील काळात समाजोपयोगी, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणार आहे अन् यासाठी सरकारचे सहकार्य मिळावे, अशी विनंती या वेळी करण्यात आली. सनातनच्या उपक्रमांना सरकार सहकार्य करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या आयोजनाची प्रशंसा करतांना हा महोत्सव अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने आयोजित केल्याबद्दल सनातन संस्थेचे कौतुक केले. विशेषत: कार्यक्रमस्थळी सभामंडप, प्रदर्शन आदींची उत्तम व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी सनातन संस्थेचे विशेष कौतुक केले.
सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै २०२५ या दिवशी सायंकाळी ६ वाजता सुंदरम् सभागृह, बँक ऑफ इंडियाजवळ, फोंडा रोड, होंडा येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या वेळी निमंत्रण देण्यात आले.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !