
मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे नुकतेच ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित करण्यात आलेला शतचंडी यज्ञ आणि धन्वंतरि याग यांचा प्रसाद सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिला. या वेळी अभय वर्तक यांनी श्री. देवेंद्र फडणवीस यांना श्री बालाजीची चांदीची मूर्ती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संक्षिप्त जीवनचरित्राचा ग्रंथ भेट दिला, तसेच साजर्या झालेल्या महोत्सवाविषयी थोडक्यात माहितीही दिली. ‘कार्यबाहुल्यामुळे महोत्सवाला उपस्थित राहू शकलो नाही’, अशी भावना या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. या वेळी सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै आणि श्रीमती पूर्णिमा प्रभु उपस्थित होत्या.
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !