विशेष दैवी गुण असलेले मंगळूरू (कर्नाटक) येथील चि. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) यांच्या संतपदाची आनंददायी सोहळ्यात घोषणा !

आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कठोर साधना करून लहान वयातच संतपद प्राप्त केल्याची उदाहरणे ज्ञात आहेत. साधकाला संतपद प्राप्त करण्यासाठी कठोर साधना करावी लागते; मात्र ‘जन्मत:च कोणी संत असू शकते का ?’ याचे उत्तर सनातनचे साधक ‘हो’ असे देतील.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा, आश्रमातील भिंती आणि साधकांचे शरीर यांवर वाईट शक्तींचे तोंडवळे आणि दैवी आकृत्या दिसणे

‘प्राचीन काळी ऋषि-मुनी यज्ञयागादी विधी करत. त्या वेळी राक्षस त्यांत विघ्ने आणत. ते ऋषि-मुनींना जिवे मारत आणि गायींना मारून खात. हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो. कलियुगांतर्गत कलियुगातही तो चालू आहे.

धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे निष्काम कार्य सनातन संस्था करत आहे ! – ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते, पंढरपूर

सनातन संस्था अलौकिक कार्य करत आहे. सनातनचे साधक निष्काम भावाने तन, मन आणि धन यांचा त्याग करून ईश्वरी कार्य करत आहेत, याविषयी मला त्यांचा अभिमान वाटतो, असे गौरवौद्गार वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू, ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी काढले.

१९७६ प्रमाणे पुन्हा घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’च्या जागी ‘हिंदु राष्ट्र’ ही सुधारणा करायला हवी ! – आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान भारताला दिले, त्यात ‘सेक्युलर’ हा शब्द कुठेही नाही; मात्र १९७६ मध्ये या संविधानात ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’ हा शब्द घुसडून आणीबाणीच्या काळात हिंदूंची घोर फसवणूक केली गेली.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविना ग्रंथप्रदर्शनाचे परिपूर्ण आणि तपशीलवार नियोजन कोणीच करू शकत नाही ! – शशिकांत ठुसे

सनातन संस्थेच्या वतीने २८ ऑक्टोबर या दिवशी धर्मरथामध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे गुरुबंधू श्री. शशिकांत ठुसे यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

बेळगाव येथील सनातनचे साधक प्रसाद हळदणकर यांनी ‘हॅगो’वर होणारे श्री दुर्गादेवीचे विडंबन रोखले !

‘हॅगो’ हे एक ऑनलाईन गेमचे (खेळाचे) ‘अ‍ॅप्लिकेशन’ आहे. यावर एकाच वेळी ३ लक्षांपेक्षा अधिक ग्राहक जोडलेले असतात. हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ उघडल्यावर त्यावर श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र असल्याचे सनातनचे साधक श्री. प्रसाद हळदणकर यांना लक्षात आले.

डोंबिवली येथील शबरीमला मंदिरप्रवेश प्रकरणी काढलेल्या निषेध फेरीत सनातन संस्थेचा सहभाग

तुम्हाला किती लोकांना हिंदूंच्या धार्मिक पुस्तकांविषयी माहिती आहे ? धर्मग्रंथांतील विचार वर्षानुवर्षे चालू आहेत. एका झटक्यात ते बदलू शकत नाहीत. अन्य धर्मियांच्या संदर्भात असे होत नाही; त्यांच्यावर अन्याय झाला की ते एकत्र येतात.

त्रिचूर (केरळ) येथे सनातनच्या वतीने जिज्ञासूंना साधना आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांविषयी मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या कु. रश्मी परमेश्वरन् आणि श्री. नंदकुमार कैमल यांनी ‘साधना, आध्यात्मिक उपाय, अध्यात्माचे महत्त्व, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे महत्त्व’ यांविषयी मार्गदर्शन केले.

रावणदहन योग्य कि अयोग्य ?

दुर्जनतेच्या नाशाचे प्रतिक म्हणून प्रतीवर्षी भारतातील अनेक भागांत शेकडो वर्षांपासून रावणदहन करण्याची परंपरा निर्विवादपणे चालू आहे.