हिंदूंनी धर्माचरणाचे महत्त्व समजून घ्यावे ! – डॉ. सतीश बागुल, सनातन संस्था

घोटाणे (नंदुरबार) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

दीपप्रज्वलन करतांना डॉ. नरेंद्र पाटील शेजारी डॉ. सतीश बागुल

 

एकाग्रतेने मार्गदर्शन ऐकतांना युवक

नंदुरबार, ३ जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील घोटाणे या गावात १ जानेवारी या दिवशी हिंदु-राष्ट्र जागृती सभा पार पडली. सभेला सनातन संस्थेचे डॉ. सतीश बागुल आणि हिंदु जनजागृती समितीचे नंदुरबार सेवक डॉ. नरेंद्र पाटील यांनी संबोधित केले.

डॉ. बागुल यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर आपले विचार मांडले. यात त्यांनी धर्माचरणाचे महत्त्व, सणांचे होणारे विकृत स्वरूप, देवतांचे होणारे विडंबन, कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, वाढदिवस हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे कसा साजरा करावा ? हे विषय मांडले. डॉ. पाटील यांनी हिंदु धर्मावर अन् हिंदूंवर होणारे आघात आणि ‘धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा’ या अंतर्गत लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोहत्या, हिंदूसंघटन या विषयांवर त्यांचे विचार मांडले. तसेच त्यांनी गावातील गोवंश कसायाला न विकण्याचे आवाहन केले. सभेला २०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. गावातील ७०-८० तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात सभेपूर्वी गावातून निमंत्रण फेरी काढली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment