मंगळूरू येथे सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरीय युवा शिबीर

व्यष्टी साधना करण्यासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या
कार्यात सहभागी होऊन समष्टी साधना करण्याचा युवकांचा निर्धार !

युवा शिबिरात सहभागी झालेले युवा साधक आणि मध्यभागी बसलेले १. पू. रमानंद गौडा

मंगळूरू (कर्नाटक) – सनातन संस्थेच्या वतीने येथील सेवाकेंद्रात २३ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘कर्नाटक राज्यस्तरीय युवा शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांतील २५ युवक सहभागी झाले होते. हे शिबीर अत्यंत उत्साहात, भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात झाले. या शिबिरात ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी कसे प्रयत्न करावे ?’, ‘सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मीडियाद्वारे) धर्मप्रसारात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो ?’, ‘भाववृद्धीसाठी कसे प्रयत्न करायचे ?’, ‘सनातन प्रभात’चे महत्त्व आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे प्रसार करायचा’, असे विषय प्रायोगिक भागासह घेण्यात आले.

कर्नाटक राज्य धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांनी युवा साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतांना व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी ‘व्यष्टी साधना होण्यासाठी दैनंदिनी कशी लिहावी ?, तसेच समष्टी साधनेच्या अंतर्गत सेवेत कशा प्रकारे सहभागी होऊन हिंदु राष्ट्राच्या कार्यात खारीचा वाटा उचलू शकतो?’, याविषयीही मार्गदर्शन केले. शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक युवा साधकाने शिबिरात सांगितलेला विषय एकाग्रतेने ऐकून तशी कृती करण्यासाठी प्रयत्न चालू केले. शिबिराचा समारोप अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाला.

शिबिरार्थींनी व्यक्त केलेले मनोगत

१. ‘मंगळूरू येथील सेवाकेंद्रात श्रीमन्नारायणाचा वास आहे’, असे अनुभवता आले’, असे एका शिबिरार्थीने सांगितले.

२. ‘सेवाकेंद्रात येण्यापूर्वी शारीरिक थकवा जाणवत होता, तसेच मनात अनावश्यक विचार आणि गोंधळ होता. सेवाकेंद्रात प्रवेश केल्यावर ते लगेचच न्यून झाले’, असे एका शिबिरार्थीने सांगितले.

क्षणचित्रे

१. शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक युवा साधकाने सेवा करण्यासाठी दिवसभरातील किती वेळ देणार याचे नियोजन केले.

२. सर्व शिबिरार्थींनी समष्टी सेवेमध्ये कसा सहभाग घेणार, हे लिहून दिले. काहींनी सामाजिक माध्यमांद्वारे प्रसार, धर्मशिक्षणवर्ग घेणे, सनातन प्रभातचे अंक वितरण करणे, हिंदु राष्ट्र-जागृती सेवेत सहभागी होणे आदी.

३. शिबिरार्थींना सेवेविषयी काहीही न सांगताही ते स्वतःहून विचारून सेवा करत होते.

४. शिबिरात स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व सांगितल्यावर शिबिरार्थिंनी लगेचच फलकावर चुका लिहिण्यास प्रारंभ केला.

५. साधनेत येणार्‍या सर्व अडचणींवर सर्वांनी शंकानिरसन करून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment