यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी महिला

यवतमाळ, ३० डिसेंबर (वार्ता.) – येथे २८ डिसेंबरला स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी पुणे येथे चालू असलेल्या संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध केला. आंदोलनात ‘सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावरील खोट्या आरोपांद्वारे होणारी अपकीर्ती थांबवावी’, ही मागणीही करण्यात आली. आंदोलनाला दीड घंट्यामध्ये ४४५ जिज्ञासूंनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दर्शवला.

आंदोलनात गुरुदेव सेवा मंडळ, महिला उत्थान मंडळ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासह ३५ ते ४० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले.

क्षणचित्रे

१. आंदोलनाला शालेय विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच धर्मशिक्षणवर्गातील महिलाही सहभागी झाल्या होत्या.

२. हिंदुत्वनिष्ठ श्री. मिलिंद ठोसर आणि गुरुदेव सेवा मंडळाचे श्री. प्रभाकर डंभारे यांनी आंदोलनाला अधिकाधिक स्वाक्षर्‍या मिळाव्यात यासाठी येणार्‍या जाणार्‍या नागरिकांचे प्रबोधन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात