सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रात मे २०१० (मूळ छायाचित्र) ते मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या पालटांचे संशोधन

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरात त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे मूळ छायाचित्र मे २०१० मध्ये ठेवण्यात आले. त्यात कालपरत्वे होत गेलेले पालट, सूक्ष्मातील कोणती स्पंदने होती ते येथे देत आहोत.

‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !

संस्थेचे अधिकृत प्रवक्ते, प्रसिद्धीपत्रक, सोशल मिडिया अकाऊंट यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणीही मांडलेली व्यक्तीगत मते ही संस्थेची भूमिका आहे, असे मानू नये. त्या मतांशी सनातन संस्था सहमत असेलच, असे नाही.

शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मार्गदर्शन !

२० जुलै या दिवशी त्यांनी नारीशक्ती संमेलनात, तर २१ जुलै या दिवशी प्रत्यक्ष शदाणी दरबारात भाविकांना मार्गदर्शन केले, तसेच छत्तीसगडमध्ये सनातन संस्थेचे साधक आणि धर्मकार्य करणारे धर्मप्रेमी यांनाही आध्यात्मिक दिशा देणारे मार्गदर्शन केले.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

सनातन आश्रमासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, भारतात अनेक आश्रम आहेत, पण असा आश्रम मी पाहिला नाही. येथील महत्त्व म्हणजे येथे ‘स्वत:ला कसे स्वीकारायचे’, ‘स्वत:वर प्रयोग कसे करायचे’, हे येथे शिकायला मिळते.

छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री विष्णूदेव साय

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारीणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नुकतीच छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णूदेव साय यांची भेट घेतली.

सनातन संस्थेच्या नावाने येणार्‍या फसव्या ई मेलपासून सावध रहा !

सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या नावे फसवे ई मेल काही लोकांना प्राप्त झाल्याचे लक्षात आले आहे.

गुरुपौर्णिमा निमित्त संत संदेश !

या भीषण युद्धकाळात केवळ स्वतःचा विचार न करता, समाजातील सात्त्विक हिंदूंचे (जिवांचे) रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत सात्त्विक हिंदूंच्या (जिवांच्या) जीवितरक्षणासाठी प्राणरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, हीच या काळातील खरी समष्टी साधना ठरणार आहे.’

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट !

प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! सनातन संस्था विश्वशांतीचे कार्य करत आहे. सनातनचे साधक भाग्यवान आहेत की, त्यांना प.पू. डॉ. आठवले यांच्यासारखे सद्गुरु लाभले आहेत. या आश्रमात साधक सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वत:चे मूल्यांकन करत आहेत. – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !

सनातन संस्थेच्या वतीने धारुहेरा येथील बेस्टेक सिटी मंदिरात २६ जून ते ३० जून या कालावधीत ५ दिवसांचे विनामल्य ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले.

जपमाळ

‘आपण ‘किती माळा जप झाला ?’, या परिमाणामध्ये जप मोजतो. ‘एक माळ म्हणजे १०८ वेळा जप करणे’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याचाच अर्थ जप मोजण्यासाठी माळ अनिवार्य होऊन जाते.