दीपावलीनिमित्त आपले नातेवाईक, परिचित, तसेच आस्थापनातील कर्मचारी आदींना सनातनचे ग्रंथ भेट स्वरूपात देऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी व्हा !
१. वाचकांत राष्ट्रप्रेम जागवणारी, त्यांना धर्मसंजीवनी देणारी आणि अध्यात्ममार्ग अनुसरणार्या जिज्ञासूंना मार्गदर्शन करणारी सनातनची ग्रंथसंपदा !
सनातनचे ग्रंथ म्हणजे राष्ट्र, धर्म, साधना आदी विषयांवरील सर्वांगस्पर्शी ज्ञानभांडार ! ग्रंथांतील लिखाण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर वाचकांना राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कृतीशील बनवणारे अन् साधनेसाठी प्रवृत्त करणारे मार्गदर्शक (गाईड) आहे. देश-विदेशांतील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना त्यांच्या कार्यात मार्गदर्शन मिळण्यासाठी या ग्रंथांचाच आधार वाटतो. जिज्ञासूही साधनेच्या ओढीने या ग्रंथांकडे धाव घेतात. समाजाला धर्माचरणी बनवण्यात या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.
२. सर्व क्षेत्रांतील जिज्ञासूंची ज्ञानतृष्णा भागवणारी सनातनची सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा !
ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे ही ग्रंथसंपदा सर्वांगस्पर्शी आहे. हिंदु धर्मतत्त्वज्ञान विशद करणारी, हिंदूंमध्ये धर्मजागृती करणारी, राष्ट्ररक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करणारी, स्वभाषाभिमान वाढवणारी ग्रंथसंपदा सनातनने प्रकाशित केली आहे. त्याचप्रमाणे धार्मिक कृतींमागील शास्त्र सांगणारी, आचारधर्माचे पालन करण्यास शिकवणारी, साधना करण्याचे महत्त्व बिंबवणारी, तसेच भावी पिढी धर्मनिष्ठ अन् राष्ट्रभक्त बनवणारी ‘बालसंस्कार’ या विषयांची ग्रंथमालिकाही उपलब्ध आहे. जिज्ञासूंना ज्या विषयात रस आहे, ते ज्ञान ग्रंथवाचनाने त्यांना निश्चितच मिळेल, यात शंका नाही !
३. दीपावलीनिमित्त ‘सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ’ इतरांना भेट स्वरूपात द्यावेत !
दीपावलीनिमित्त बरेच जण आपले आप्तेष्ट, परिचित, स्नेही आदींना भेटवस्तू देतात, तर काही व्यावसायिक ग्राहक आणि कर्मचारी यांना भेट देतात. अनमोल विचारधन असलेली सनातनची ग्रंथसंपदा इतरांना भेट म्हणून दिल्यास त्या माध्यमातून देणार्यांची धर्मसेवा होईल आणि ग्रंथ सर्वदूर पोचतील. ‘या धर्मसेवेत कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो ?’, ते पुढे दिले आहे.
अ. भाऊ बहिणीला भाऊबिजेनिमित्त ओवाळणी देतो. त्या वेळी ‘सनातनचे ग्रंथ किंवा लघुग्रंथ’, ही वैशिष्ट्यपूर्ण ओवाळणी ठरेल.
आ. सुवर्णकार दीपावलीच्या काळात सोने खरेदी करणार्या ग्राहकांना भेटवस्तू देतात. सनातनचे अलंकाराविषयीचे ग्रंथ आणि लघुग्रंथ ग्राहकांना भेट देऊन या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची सुवर्णकारांना संधी आहे.
इ. ‘शॉपिंग मॉल्स’, ‘सुपर बझार’, वस्त्रदालने, मिठाई भांडार (‘स्वीट मार्ट’) आदींचे मालक या काळात ग्राहकांना भेटवस्तू देतात. ग्रंथ आणि लघुग्रंथ यांचे आकर्षक संच बनवून ते ग्राहकांना देऊ शकतो.
ई. व्यवसाय करणारे हितचिंतक आपल्या सहकार्यांना, तसेच आस्थापनातील कर्मचार्यांना दीपावलीनिमित्त भेट स्वरूपात ग्रंथ आणि लघुग्रंथ देऊन त्या माध्यमातून राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात सहभागी होऊ शकतात.
उ. काही दिवसांत लग्नसराई चालू होईल. त्या निमित्ताने कपड्यांच्या दुकानदारांना संपर्क करून त्यांना ग्राहकांना भेट स्वरूपात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यास सांगू शकतो. या माध्यमातून दुकानदारांना धर्मकार्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळू शकते !
आपल्या प्रियजनांना सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांची अनमोल भेट द्या !
आजच आपली मागणी करण्यासाठी SanatanShop.com या संकेतस्थळाला भेट द्या !
धर्मप्रसारासाठी सनातनच्या बहूपयोगी सात्त्विक भेट-पेटीचा परिणामकारक उपयोग करा
सनातन संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही बहूपयोगी सात्त्विक भेट-पेटी (‘गिफ्ट बॉक्स’) सिद्ध करण्यात आली आहे. तिचा आकार (१० इंच Ñ ६ इंच Ñ १.८ इंच) असा आहे. या भेट-पेटीवरील रंगसंगती, अक्षरे, नक्षी इत्यादी ‘ती घेणार्याला आणि देणार्याला अधिक सात्त्विकता मिळावी’, या उद्देशाने बनवण्यात आली आहे. या पेटीवर संतांचे संदेश आणि साधनेविषयी मार्गदर्शनही आहे. त्यामुळे या भेट-पेटीचा वापर करणार्याला आपोआपच धर्मप्रसारात सहभागी होता येईल. या भेट-पेटीचे अर्पणमूल्य ३५ रुपये आहे.
सात्त्विक भेट-पेटीचा वापर पुढीलप्रमाणे करता येईल !
१. या भेट-पेटीमध्ये सनातनची पूजोपयोगी उत्पादने (अत्तर, कापूर, कुंकू, उदबत्ती, अष्टगंध, गोमूत्र-अर्क), नित्योपयोगी उत्पादने (साबण, दंतमंजन, त्रिफळा चूर्ण, उटणे, केशतेल, संस्कार वही), तसेच ग्रंथ अन् लघुग्रंथ आकर्षकरित्या ठेवून इतरांना दिल्यास तो एक ‘सात्त्विक भेटसंच’ ठरेल. (‘या भेटसंचात कोणती उत्पादने आणि ग्रंथ ठेवायचे ?’, हे हितचिंतक आपापल्या आवडीनुसार ठरवू शकतात. उत्पादने वा ग्रंथ यांच्या संख्येनुसार भेटसंचाची रक्कम ठरेल.)
२. दीपावलीच्या निमित्ताने व्यापारी संकुले (‘शॉपिंग मॉल्स’, ‘सुपर बझार’ इत्यादी), वस्त्रदालने, मिठाई भांडार (‘स्वीट मार्ट’) इत्यादींचे मालक ग्राहकांना भेटवस्तू देतात. ही भेटवस्तू या आकर्षक भेट-पेटीत घालून देता येईल.
३. विवाह, नामकरण विधी, वाढदिवस, वास्तुशांत इत्यादी कार्यक्रमांच्या निमित्ताने इतरांना भेटवस्तू देतांना ती रंगीत कागदात आच्छादित करून देण्याऐवजी या पेटीत घालून देऊ शकतो.
४. पूजासाहित्य, तसेच नित्योपयोगी साहित्य ठेवण्यासाठीसुद्धा ही पेटी उपयुक्त आहे. केवळ दिवाळी इत्यादी सणांच्या निमित्तानेच नव्हे, तर वर्षभरही या बहूपयोगी पेटीचा वापर करता येईल.
५. साधक या पेटीत वैयक्तिक उपायांचे साहित्यही ठेवू शकतात.
ही वैशिष्ट्यपूर्ण आणि सात्त्विक भेट-पेटी खरेदी करण्यासाठी हितचिंतकांनी स्थानिक वितरकांशी संपर्क साधावा किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर मागणी करावी.
– श्री. पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.१०.२०२६)

सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
नाशिक कुंभमेळ्याच्या भव्य धर्मध्वज नगर परिक्रमेचे सनातन संस्थेने केले स्वागत !
प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) यांचे समाधीगमन !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जडिगेनहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री कालभैरव देवतेचे घेतले...
अहिल्यानगर येथील नेप्ती आश्रमात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या शुभहस्ते भगवान श्री गोपाळकृष्णाच्या मूर्तीची...