‘गरबा’ हा मूळत: ‘गर्भदीप’ या संकल्पनेतून आलेला एक अत्यंत सात्त्विक आणि आध्यात्मिक नृत्योत्सव आहे. पारंपरिक पद्धतीत मध्यभागी देवीची मूर्ती किंवा घट (गरबो) ठेवून त्याभोवती चक्राकार फिरून देवीची भक्ती आणि तिची शक्ती (ऊर्जा) ग्रहण केली जाते. पूर्वी ‘गरबा’ या नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची आणि संतरचित गीतेच म्हटली जात असत.

सध्या भगवंताच्या या सामूहिक नृत्योपासनेला विकृत (असात्त्विक) स्वरूप आले आहे. असात्त्विक ‘गरबा’ म्हणजे देवीचे कोणतेही स्मरण न करता किंवा तिच्याप्रती कोणताही भाव न ठेवता केवळ मौजमजा आणि मनोरंजन यांसाठी ‘गरबा’ खेळणे होय. अशा वेळी पारंपरिक आणि भक्तीपूर्ण संगीताऐवजी ‘रिमिक्स’ गाणी, चित्रपटांतील गाणी आणि असात्त्विक संगीत वापरले जाते. यात परिधान केलेले कपडे हे अंगप्रदर्शन आणि दिखाऊपणा करणारे असतात, तसेच केशरचनाही सात्त्विकतेपेक्षा केवळ आकर्षणासाठी केली जाते. नवरात्रीच्या काळात ब्रह्मांडात देवीतत्त्व आणि आदिशक्तीची स्पंदने मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतात. सात्त्विक पद्धतीने गरबा खेळल्यास ही सात्त्विक स्पंदने आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. याउलट असात्त्विक पद्धतीने ‘गरबा’ खेळल्यामुळे वातावरणातील रज-तमात्मक स्पंदने वाढतात, आध्यात्मिक दृष्टीने कोणताही लाभ मिळत नाही, तसेच सणाचे मूळ पावित्र्य नष्ट होते.
१. असात्त्विक पद्धतीने ‘गरबा’ खेळतांना होणारे सूक्ष्मातील परिणाम !

सनातनच्या एक महिला संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

१ अ. अहं
१ अ १. अहंचे वलय ‘गरबा’ खेळणार्या व्यक्तीच्या अनाहतचक्राच्या स्थानी कार्यरत होत असणे : व्यक्ती केवळ मनोरंजन म्हणून ‘गरबा’ खेळते, तसेच अंगप्रदर्शन करणारा पेहराव आणि केस मोकळे सोडून चित्रपटातील गीतांच्या तालावर नृत्य करते. यांमुळे अहंचे वलय ‘गरबा’ खेळणार्या व्यक्तीच्या अनाहतचक्राच्या स्थानी कार्यरत होते.
१ अ २. अहंचे कण व्यक्ती आणि असात्त्विक संगीत यांतून वातावरणात प्रक्षेपित होत असणे : हे अहंचे कण सभोवताली उपस्थित असणार्या लोकांकडेही प्रक्षेपित होतात आणि तेही अशा पद्धतीने ‘गरबा’ खेळण्यासाठी प्रवृत्त होत असून नकळत त्यांच्यातही अहं निर्माण होतो.
१ आ. त्रासदायक शक्ती
१ आ १. त्रासदायक शक्तीच्या धूसर लहरी व्यक्तीच्या सभोवताली प्रवाहित होत असणे : असात्त्विक पोशाख परिधान करून, तसेच केस मोकळे सोडून चित्रपटातील गीतांवर अश्लील अंगविक्षेप करत ‘गरबा’ नृत्य केल्यामुळे त्रासदायक शक्तीच्या धूसर लहरी व्यक्तीच्या सभोवताली प्रवाहित होतात.
१ आ २. त्रासदायक शक्तीच्या धूसर लहरी व्यक्तीकडून जलद गतीने वातावरणात प्रक्षेपित होत असणे : असात्त्विक संगीत आणि नृत्य यांमुळे निर्माण होणार्या रजोगुणी लहरींमुळे त्रासदायक शक्तीच्या धूसर लहरी व्यक्तीकडून जलद गतीने वातावरणात प्रक्षेपित होतात.
१ आ ३. व्यक्तीच्या देहाभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण वाढत असणे : असात्त्विक पोशाख परिधान करून चित्रपटातील गीतांवर अश्लील अंगविक्षेप करत ‘गरबा’ नृत्य केल्यामुळे व्यक्तीच्या देहाभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण वाढते.
१ इ. मायावी शक्ती
१ इ १. मायावी शक्तीचे वलय व्यक्तीच्या चेहर्याभोवती कार्यरत होत असणे : ‘मी देवीसाठीच ‘गरबा’ नृत्य करत आहे आणि मला यातून आनंद मिळत आहे’, असे व्यक्तीला वाटते. प्रत्यक्षात मात्र व्यक्तीला हे लक्षात येत नाही की, असात्त्विक पद्धतीने ‘गरबा’ नृत्य केल्याने तिचे देवीशी अनुसंधान साधले जात नाहीच, उलट व्यक्तीचा आध्यात्मिक त्रास वाढतो.
१ ई. आकर्षण शक्ती
१ ई १. आकर्षण शक्तीचे कण अन्य व्यक्तींनाही ‘असात्त्विक पेहराव करणे आणि असात्त्विक पद्धतीने ‘गरबा’ नृत्य करणे’, यांसाठी आकर्षित (प्रवृत्त) करत असणे’
– सनातनच्या एक महिला संत, विदेश (२७.९.२०२६)
२. सात्त्विक पद्धतीने ‘गरबा’ खेळतांना होणारे सूक्ष्मातील परिणाम !


सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण निराळे येण्याचे कारण
सनातनचे काही सद्गुरु, संत आणि साधक सूक्ष्मातील ज्ञान मिळवतात. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण हे साधकाची पातळी, काळ, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. साधक, संत आणि सद्गुरु या क्रमानुसार त्यांची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे साधक, संत आणि सद्गुरु यांनी शोधून काढलेल्या एखाद्या सूक्ष्मातील स्पंदनांच्या टक्केवारीत भेद असू शकतो.
२ अ. भाव
२ अ १. आध्यात्मिक भावाचे वलय ‘गरबा’ खेळणार्या व्यक्तीच्या अनाहतचक्राच्या स्थानी कार्यरत होत असणे : व्यक्ती जेव्हा देवीच्या भक्तीमय गीतावर सात्त्विक पद्धतीने ‘गरबा’ नृत्य करते, तेव्हा तिच्यात देवीप्रती भाव जागृत होऊन (आध्यात्मिक) भावाचे वलय तिच्या अनाहतचक्राच्या स्थानी कार्यरत होते.
२ आ. देवीतत्त्व
२ आ १. देवीतत्त्वाचे कण आशीर्वाद स्वरूपात ‘गरबा’ खेळणार्या व्यक्तीकडे आकृष्ट होत असणे : ‘गरबा’ खेळतांना व्यक्तीचा देवीप्रती भाव असल्यामुळे देवीतत्त्वाचे कण आशीर्वादाच्या स्वरूपात ‘गरबा’ खेळणार्या व्यक्तीकडे आकृष्ट होतात.
२ आ २. देवीतत्त्वाचे वलय ‘गरबा’ खेळणार्या व्यक्तीच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत होत असणे : ‘गरबा’ खेळतांना व्यक्तीचे देवीशी अनुसंधान साधले जात असल्यामुळे देवीतत्त्वाचे वलय तिच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत होते.
२ इ. सगुण चैतन्य
२ इ १. सगुण चैतन्य व्यक्तीच्या देहाभोवती असणे : सात्त्विक पोशाख परिधान करून, सात्त्विक केशरचना करून, तसेच देवीप्रती भाव ठेवून सात्त्विक संगीतावर ‘गरबा’ नृत्य केल्याने सगुण चैतन्य व्यक्तीच्या देहाभोवती कार्यरत होते.
२ इ २. सगुण चैतन्याचे कण वातावरणात प्रक्षेपित होत असणे : सात्त्विक संगीतावर ‘गरबा’ नृत्य केल्याने सगुण चैतन्याचे कण वातावरणात प्रक्षेपित होतात.
२ ई. आनंद
२ ई १. आनंदाचे वलय व्यक्तीच्या चेहर्याभोवती कार्यरत होत असणे : ‘गरबा’ खेळतांना व्यक्ती देवीच्या अनुसंधानात राहून तिचे अस्तित्व अनुभवत असल्यामुळे आनंदाचे वलय तिच्या चेहर्याभोवती कार्यरत होते.’
– सनातनच्या एक महिला संत, विदेश (२७.९.२०२६)
‘घडा’ या पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम
पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम
कोरोना महामारीच्या आपत्कालीन स्थितीत नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?
शक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती देवीचे विविध प्रकार, तसेच नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे अन् त्यांची...
नवरात्र : बाजारीकरण आणि संभाव्य धोके !
काही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये