
उज्जैन (मध्यप्रदेश) – ‘सेवाज्ञ संस्थानम् (सेवाज्ञ फाऊंडेशन)’ने येथील गीता भवन येथे ‘युवा धर्म संसदे’त भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात ‘सनातन संस्थे’च्या वतीने ज्ञानवर्धक ग्रंथाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनात सनातनच्या विविध विषयांवरील अनेक भाषांमधील मोलाचे ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले होते. या वेळी मध्यप्रदेश युवा आयोगाचे अध्यक्ष श्री. प्रवीण शर्मा, विविध क्षेत्रांतील विचारवंत आणि देशभरातून आलेले शेकडो तरुण प्रतिनिधी यांनी सनातनच्या प्रदर्शन कक्षाला भेट दिली. श्री. प्रवीण शर्मा यांनी सनातन संस्थेच्या प्रदर्शनाची पहाणी करून संस्थेने समाजाला आणि नव्या पिढीला धर्म-संस्कृतीशी जोडण्यासाठी चालवलेल्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हे प्रदर्शन तरुणांना त्यांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मुळांशी जोडणारे ठरले.
फरीदाबाद (हरियाणा) येथे नवरात्रोत्सवात सनातन संस्था आयोजित व्याख्याने आणि ग्रंथप्रदर्शन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदूंनी नवरात्रात केवळ ९ दिवस देवीचा जागर न करता वर्षभर देवीची उपासना करावी ! –...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्याकडून सनातन...
विविध मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या !
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...