महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्याकडून सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसा

Article also available in :

ग्रंथप्रदर्शन पहातांना सौ. अमिता चव्हाण, शेजारी पू. (श्रीमती) अनिता बरारा

नांदेड – येथील कालीजी टेकडी, मोंढा या ठिकाणी असलेल्या कालीमातेच्या मंदिराच्या प्रांगणात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. १५ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांनी या प्रदर्शनास सदिच्छा भेट दिली. भेट दिल्यावर सौ. अमिता चव्हाण यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून ‘अशा कार्याची आज आवश्यकता आहे’, असे मत व्यक्त केले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या संत पू. (श्रीमती) अनिता बरारा उपस्थित होत्या.