
बेळगाव – आजचा युवक हा भावी राष्ट्र आणि धर्माचा आधारस्तंभ असतांना आजची युवा पिढी व्यसनाधिनतेच्या विळख्यात सापडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी मेणबत्ती विझवणे यांसारख्या पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणार्या प्रथांमध्ये आपण अडकून आपल्या संस्कृतीपासून लांब जात आहोत. यासाठी हिंदूंनी नवरात्रात केवळ ९ दिवस देवीचा जागर न करता वर्षभर देवीची उपासना करावी आणि आपल्यातील शौर्य जागृत करावे. हिंदु युवती आज मोठ्या प्रमाणात ‘लव्ह जिहाद’च्या तावडीत सापडत आहेत. महिलांनी राणी चेनम्मा आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आचरण केल्यास या समस्येला तोंड देणे शक्य होईल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

बेळगाव जिल्ह्यातील नंदीहळ्ळी येथे आयोजित दुर्गादौडीमध्ये त्या बोलत होत्या. सर्वप्रथम गावातील दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये प्रेरणा मंत्र आणि आरती यांनी दौडीचा प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन लक्ष्मी मंदिर या ठिकाणी सांगता करण्यात आली. या दौडीमध्ये सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वारकरी, तरुण असे ५०० हून अधिक हिंदू सहभागी होते.
फरीदाबाद (हरियाणा) येथे नवरात्रोत्सवात सनातन संस्था आयोजित व्याख्याने आणि ग्रंथप्रदर्शन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
‘सेवाज्ञ फाऊंडेशन’च्या ‘युवा धर्म संसद’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन ठरले विशेष आकर्षण !
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्याकडून सनातन...
विविध मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या !
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...