दीपावलीनिमित्त आपले नातेवाईक, परिचित, तसेच आस्थापनातील कर्मचारी आदींना सनातनचे ग्रंथ भेट स्वरूपात देऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी व्हा !

व्यवसाय करणारे हितचिंतक आपल्या सहकार्‍यांना, तसेच आस्थापनातील कर्मचार्‍यांना दीपावलीनिमित्त भेट स्वरूपात ग्रंथ आणि लघुग्रंथ देऊन त्या माध्यमातून राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात सहभागी होऊ शकतात.

देव, देश, धर्म रक्षणासाठी कृतीशील आणि ठोस संघटन आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘लव्ह जिहाद’, ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि ‘वक्फ बोर्डा’द्वारे भूमींचा दुरुपयोग यांसारख्या समस्यांवर व्यापक जागृती अन् कायदे आवश्यक आहेत. हिंदु समाजासाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करून आध्यात्मिक बळ वाढवायला हवे……..

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त प्रवचन आणि सामूहिक नामजप पार पडला !

नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘अशोका सिटी सोसायटी’मधील ज्योती गुप्ता आणि शैलजा धिमान यांच्या निवासस्थानी प्रवचन अन् सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे नवरात्रोत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

देहली येथील रमेशनगर ब्लॉक ९ मधील श्री सनातन धर्म महावीर मंदिर सभेच्या हनुमान मंदिरामध्ये ‘नवरात्र’ विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या वेळी घटस्थापना, कुंकूमार्चन आणि कन्यापूजन यांविषयी …

धारुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त शास्त्रोक्त माहितीच्या आधारावर प्रवचन

नवरात्रोत्सवानिमित्त येथील ‘सोसायटी बेस्टेक सिटी’च्या मंदिरामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.

केरळमधील श्री कुरुंबा भगवती मंदिराचे मुख्य पुजारी अधिवक्ता एम्. त्रिविक्रमण् अडिकल यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

केरळमधील प्रसिद्ध कोडुंगल्लूर श्री कुरुंबा भगवती मंदिराचे मुख्य पुजारी अधिवक्ता एम्. त्रिविक्रमण् अडिकल यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

धर्मप्रसारासाठी सनातनच्या बहूपयोगी सात्त्विक भेट-पेटीचा परिणामकारक उपयोग करा !

या पेटीवर संतांचे संदेश आणि साधनेविषयी मार्गदर्शनही आहे. त्यामुळे या भेट-पेटीचा वापर करणार्‍याला आपोआपच धर्मप्रसारात सहभागी होता येईल. या भेट-पेटीचे अर्पणमूल्य ३० रुपये आहे.

पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन !

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, श्री. अमोल काळे आणि श्री. शरद कळसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.

शारदीय नवरात्रोत्सवात सनातन संस्थेद्‍वारे रायगड जिल्ह्यात जिज्ञासूंना मार्गदर्शन

जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचने घेण्यात आली. ‘नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावरील प्रवचनातून नवरात्रीतील विविध धार्मिक कृतींचे शास्त्र तसेच, गरब्यामध्ये होणारे अपप्रकार आणि लव्ह जिहादची समस्या यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

मिरज येथील सनातनच्या आश्रमास श्री श्री यति अनिरुद्धतीर्थनंदजी महाराज यांची सदिच्छा भेट !

श्री श्री यति अनिरुद्धतीर्थनंदजी महाराज यांना सनातन संस्थेच्या कार्याची माहिती श्री. द्वारकाधीश मुंदडा यांनी दिली, तसेच महाराजांना आश्रमाचे दर्शनही घडवून आश्रमात चालणार्‍या विविध सत्कार्यांची माहिती दिली.