सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती

‘अध्यात्मशास्त्र आचरणात आणून मानवजातीचे कल्याण व्हावे’, या उद्देशाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, संस्कृतीचे आचरण, आध्यात्मिक स्तरावरील उपाय, ईश्वरप्राप्तीसाठी कला, तसेच राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, हिंदु राष्ट्र यांसारख्या विविधांगी विषयांवर ३६९ ग्रंथांचे संकलन केले आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंत सनातनने ग्रंथांच्या १३ भाषांमध्ये १ कोटी १ लाख ७१ सहस्र प्रती प्रकाशित केल्या आहेत. अध्यात्मशास्त्राच्या प्रचारासाठी या ग्रंथांची प्रदर्शने भारतभरात अनेक ठिकाणी नियमितपणे लावली जातात.
आपणही पुढील प्रसंगी सनातनच्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करून या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होऊ शकता.
१. आपल्या परिसरातील किंवा आपण जोडलेले असाल, अशा मंदिरांतील सण, उत्सव किंवा यात्रा.
२. विवाह, मुंज, वाढदिवस यांसारखे कौटुंबिक कार्यक्रम
३. राष्ट्र-धर्माशी संबंधित उपक्रम
४. कीर्तन, प्रवचन, व्याख्यान किंवा सभा इत्यादी
५. आपल्या भागातील होणारी पुस्तक संमेलने (बूक फेअर)
आपल्यालाही असे ग्रंथप्रदर्शन आयोजित करायचे असल्यास त्यासाठी आपण जिल्ह्यातील सनातनच्या साधकांना संपर्क करू शकता. आपल्या मागणीनुसार सनातन संस्थेचे साधक त्या त्या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आयोजित करू शकतात. आपण अशी ग्रंथप्रदर्शने आयोजित केल्यास सनातन धर्मातील अध्यात्माचा प्रचार-प्रसार होणार आहे !
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !