नियमित स्वयंसूचनांची सत्रे केल्यामुळे आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही प्रत्येकाला भेडसावणारी एक समस्या आहे. आत्मविश्वासाच्या अभावासह आपले व्यक्तीमत्त्व आणि चित्तावरील संस्कार त्याला ९० टक्के कारणीभूत असतात. तणाव घालवण्यासाठी अंतर्मनातील मूळ स्वभावदोषांवर मात करण्यासाठी स्वयंसूचनेचा चांगला लाभ होतो.

कन्नूर (केरळ) येथे सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी अध्यात्म आणि धर्माचरण यांचे महत्त्व यांविषयीचे प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या साधकांनी उपस्थितांना ‘दैनंदिन जीवनात आध्यात्मिक विज्ञानाचे महत्त्व, सनातन धर्म आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यांविषयी सांगितले.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

१५.२.२०२६ या दिवशी महाशिवरात्र आहे. त्या निमित्ताने आपल्याला सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

कळंबोली (नवी मुंबई) येथे मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी बालक-पालक मेळावा !

मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालकत्व ही सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे. ती केवळ मुलांच्या मूलभूत, पालनपोषणाच्या गरजा पुरवण्यापुरती मर्यादित नसून मुलांना आधुनिक आणि कृत्रिम तंत्रज्ञानाच्या जगात वावरतांना संस्कारक्षम बनवण्याचे मोठे दायित्व अंगीकारते.

सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन आपल्या क्षेत्रात आयोजित करून अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा !

‘अध्यात्मशास्त्र आचरणात आणून मानवजातीचे कल्याण व्हावे’, या उद्देशाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, संस्कृतीचे आचरण, आध्यात्मिक स्तरावरील उपाय, ईश्वरप्राप्तीसाठी कला, तसेच राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, हिंदु राष्ट्र यांसारख्या विविधांगी विषयांवर ३६९ ग्रंथांचे संकलन केले आहे.

ईश्वरप्राप्तीसाठी त्यागाचे महत्त्व !

तन-मन-धन यांचा त्याग आणि सर्वस्व अर्पण करण्याची सिद्धता यांद्वारे साधकातील अहंचा लय होऊ लागतो. त्याचे संचित आणि प्रारब्ध संपते. त्याला ईश्वराची प्राप्ती होते आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते.

पिंपरी-चिंचवड येथील ‘आय.डी.टी.आर्.’ संस्थेत वाहनचालकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त मन:स्थिती’ विषयावर मार्गदर्शन !

मनावर येणार्‍या ताणामागील शारीरिक आणि मानसिक कारणे समजून घेऊन त्यावर नामजप, प्राणायाम अन् स्वयंसूचना या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास मन चिंताविरहित अन् प्रसन्न रहाते.

फरीदाबाद (हरियाणा) येथील ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

हरियाणा सरकारच्या वतीने येथील सेक्टर १२ च्या ‘एच्.एस्.व्ही.पी. कन्व्हेन्शन’ सभागृहामध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रदर्शन लावण्यात आले होते.

८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !

आज हिंदूंची केवळ भारतातीलच काही राज्यांमध्ये सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी केवळ दांडिया, होळी किंवा दिवाळी यांसारख्या सणांमध्ये रमून न जाता उर्वरित प्रदेश जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे आपला देश केवळ हिंदु राष्ट्रच नाही, तर ‘प्रजासत्ताक हिंदु राष्ट्र’ बनेल.

Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !

लाठी, भाला, दांडपट्टा, कुर्‍हाडी, चक्रीपाश, तलवार, विटा आदी शिवकालीन शस्त्रकला या वेळी सादर करण्यात आल्या. अनेक शत्रूंशी एकाच वेळी कसे लढावे ? युवतीची छेड काढल्यास प्रतिकार कसा करावा ? याची प्रात्येक्षिकेही या वेळी सादर करण्यात आली.