
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना १ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगाने ‘आय.डी.टी.आर्.’ (ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था) येथे रस्ता सुरक्षा महिन्याचा औपचारिक उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त ‘आय.डी.टी.आर्.’द्वारे जानेवारी महिन्यात विविध जनजागृती उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच रस्ता सुरक्षा विषयक कृतीशील उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या अंतर्गत येथील प्रसिद्ध ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च’ संस्थेत सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त मन:स्थितीचे महत्त्व आणि उपाय’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत सनातनच्या साधिका प्राचार्य श्रीमती हेमलता खेडकर यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी रुग्णवाहिका चालक, महिला कॅबचालक आणि इतर प्रशिक्षणार्थी असे पुष्कळ जण उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करतांना श्रीमती खेडकर म्हणाल्या की, रुग्णवाहिकेसारखी महत्त्वाची वाहने चालवतांना चालकाचे मन शांत आणि सकारात्मक असणे आवश्यक आहे. मनावर येणार्या ताणामागील शारीरिक आणि मानसिक कारणे समजून घेऊन त्यावर नामजप, प्राणायाम अन् स्वयंसूचना या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास मन चिंताविरहित अन् प्रसन्न रहाते. हे प्रयत्न आपल्या व्यक्तीमत्त्व विकासासाठीही अत्यंत पूरक आहेत.
कार्यशाळेत नेहमीच्या विषयांसोबतच ‘मानसिक ताण निर्मूलना’चा विषय समाविष्ट केल्याविषयी प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमासाठी ‘आय.डी.टी.आर्.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय ससाणे आणि प्रशिक्षक श्री. दिनेश मंडोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
| स्वयंसूचनेचे महत्त्व बिंबवले
कोल्हापूरचे प्रशिक्षणार्थी श्री. दत्तात्रय सुतार यांनी मांडले की, प्रशिक्षक मागे बसलेले असल्यास दडपणामुळे ‘हँड ब्रेक’ काढायला विसरण्यासारख्या चुका होतात. यावर श्रीमती खेडकर यांनी अशा प्रसंगात स्वयंसूचना देऊन आत्मविश्वास कसा वाढवावा ? याचे प्रायोगिक मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा सकारात्मक परिणाम पाहून श्री. संजय ससाणे यांनी हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या प्रशिक्षणात सहभागी करून घेणार, असे सांगितले. |
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
सनातन संस्था आयोजित बालसंस्कारवर्ग ‘मुलांवर संस्कार करणे आणि त्यांचे चारित्र्य घडवणे’ यांसाठी अत्यंत प्रभावी ठरलेले...