Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५

सव्यसाचि गुरुकुलम् चे विद्यार्थी युद्धकलेचे प्रात्यक्षिक दाखवताना

भारत मंडपम्, नवी देहली – कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या विद्यार्थ्यांनी १४ डिसेंबर या दिवशी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात शिवकाळातील विविध शस्त्रांद्वारे युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. या युद्धकलेने उपस्थित सर्वांची मने जिंकली. सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात युद्धकलेचा गौरव केला आणि युद्धकला सादर करणारे ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे आचार्य श्री. लखन चौधरी आणि त्यांचे विद्यार्थी यांना उभे राहून अभिवादन केले. सभागृहात प्रात्यक्षिके चालू असतांना हिंदुत्वनिष्ठांनी ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो’ अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या.


लाठी, भाला, दांडपट्टा, कुर्‍हाडी, चक्रीपाश, तलवार, विटा आदी शिवकालीन शस्त्रकला या वेळी सादर करण्यात आल्या. अनेक शत्रूंशी एकाच वेळी कसे लढावे ? युवतीची छेड काढल्यास प्रतिकार कसा करावा ? याची प्रात्येक्षिकेही या वेळी सादर करण्यात आली. या रोमांचकारी प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांमध्ये वीरश्री निर्माण झाली आणि भविष्यातील संकटांना दोन हात करण्यासाठी त्यांनी मनोनिश्चय झाला.

आचार्य लखन जाधव आणि विद्यार्थी यांचा सत्कार !

आचार्य श्री. लखन जाधव गुरुजी आणि प्रात्यक्षिके सादर करणारे विद्यार्थी यांचा सत्कार करताना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे आचार्य श्री. लखन जाधव गुरुजी आणि प्रात्यक्षिके सादर करणारे विद्यार्थी यांचा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सत्कार करण्यात आला. या वेळी लखन जाधव गुरुजी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा आशीर्वाद घेतला.

आचार्य श्री. लखन जाधवगुरुजी यांची गळाभेट घेताना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांची आणखी काही क्षणचित्रे

 

Leave a Comment