
फरीदाबाद (हरियाणा) – हरियाणा सरकारच्या वतीने येथील सेक्टर १२ च्या ‘एच्.एस्.व्ही.पी. कन्व्हेन्शन’ सभागृहामध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, राष्ट्र-धर्म, आयुर्वेद, संरक्षण, स्वभावदोष निर्मूलन, धर्मशिक्षण आदी विषयांवरील ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या वेळी प्रदर्शन स्थळाला ‘एन्.आय.टी., फरीदाबाद’ येथील भाजपचे आमदार श्री. सतीश फगना, वल्लभगड येथील भाजपचे आमदार श्री. मूलचंद शर्मा, महापौर प्रवीण जोशी, गोपाळ गौशाळेचे प्रमुख रमेश गुप्ता, महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेणू भाटिया आदी मान्यवरांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
क्षणचित्रे
१. आमदार श्री. सतीश फगना म्हणाले की, त्यांच्या परिसरातील सर्व सरकारी शाळांमध्ये मुले आणि शिक्षक यांच्यासाठी ते सनातन संस्थेचे मार्गदर्शन ठेवण्यासाठी प्रयत्न करतील.
२. अधिवक्ता राकेश सचदेवा यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. ते म्हणाले, ‘‘२० वर्षांपूर्वी महाविद्यालयात असतांना त्यांनी सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला भेट दिली होती. त्या वेळी सनातनच्या साधकांनी त्यांना नामस्मरण करायला सांगितले होते. त्या वेळी त्यांनी प्रदर्शनातून भगवान श्रीकृष्णाचे चित्र घेतले होते, जे अजूनही त्यांच्या पैशाच्या बटव्यामध्ये (पर्समध्ये) आहे.’
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !