नांदेड सिटी (पुणे) येथे जिज्ञासूंनी घेतला ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ प्रवचनाचा लाभ

सिंहगड रस्ता येथील नांदेड सिटीमधील श्री स्वामी समर्थ मठ आणि महाअवतार बाबा मठ येथे आयोजित प्रवचन या कार्यक्रमाचा लाभ १५० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु धर्मियांची स्थिती केविलवाणी झाली आहे ! – सद्गुरु स्वाती खाडये

कडाक्याच्या थंडीतही सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन पूर्ण होईपर्यंत एकही जिज्ञासू जागेवरून उठला नाही. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या देवतांची सात्विक चित्रे, नामपट्टी, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

नियमित स्वयंसूचनांची सत्रे केल्यामुळे आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही प्रत्येकाला भेडसावणारी एक समस्या आहे. आत्मविश्वासाच्या अभावासह आपले व्यक्तीमत्त्व आणि चित्तावरील संस्कार त्याला ९० टक्के कारणीभूत असतात. तणाव घालवण्यासाठी अंतर्मनातील मूळ स्वभावदोषांवर मात करण्यासाठी स्वयंसूचनेचा चांगला लाभ होतो.

कन्नूर (केरळ) येथे सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी अध्यात्म आणि धर्माचरण यांचे महत्त्व यांविषयीचे प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या साधकांनी उपस्थितांना ‘दैनंदिन जीवनात आध्यात्मिक विज्ञानाचे महत्त्व, सनातन धर्म आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यांविषयी सांगितले.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

१५.२.२०२६ या दिवशी महाशिवरात्र आहे. त्या निमित्ताने आपल्याला सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

कळंबोली (नवी मुंबई) येथे मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी बालक-पालक मेळावा !

मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालकत्व ही सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे. ती केवळ मुलांच्या मूलभूत, पालनपोषणाच्या गरजा पुरवण्यापुरती मर्यादित नसून मुलांना आधुनिक आणि कृत्रिम तंत्रज्ञानाच्या जगात वावरतांना संस्कारक्षम बनवण्याचे मोठे दायित्व अंगीकारते.

सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन आपल्या क्षेत्रात आयोजित करून अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा !

‘अध्यात्मशास्त्र आचरणात आणून मानवजातीचे कल्याण व्हावे’, या उद्देशाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, संस्कृतीचे आचरण, आध्यात्मिक स्तरावरील उपाय, ईश्वरप्राप्तीसाठी कला, तसेच राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, हिंदु राष्ट्र यांसारख्या विविधांगी विषयांवर ३६९ ग्रंथांचे संकलन केले आहे.

ईश्वरप्राप्तीसाठी त्यागाचे महत्त्व !

तन-मन-धन यांचा त्याग आणि सर्वस्व अर्पण करण्याची सिद्धता यांद्वारे साधकातील अहंचा लय होऊ लागतो. त्याचे संचित आणि प्रारब्ध संपते. त्याला ईश्वराची प्राप्ती होते आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते.

पिंपरी-चिंचवड येथील ‘आय.डी.टी.आर्.’ संस्थेत वाहनचालकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त मन:स्थिती’ विषयावर मार्गदर्शन !

मनावर येणार्‍या ताणामागील शारीरिक आणि मानसिक कारणे समजून घेऊन त्यावर नामजप, प्राणायाम अन् स्वयंसूचना या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास मन चिंताविरहित अन् प्रसन्न रहाते.

फरीदाबाद (हरियाणा) येथील ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

हरियाणा सरकारच्या वतीने येथील सेक्टर १२ च्या ‘एच्.एस्.व्ही.पी. कन्व्हेन्शन’ सभागृहामध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रदर्शन लावण्यात आले होते.