कळंबोली (नवी मुंबई) येथे मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी बालक-पालक मेळावा !
मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालकत्व ही सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे. ती केवळ मुलांच्या मूलभूत, पालनपोषणाच्या गरजा पुरवण्यापुरती मर्यादित नसून मुलांना आधुनिक आणि कृत्रिम तंत्रज्ञानाच्या जगात वावरतांना संस्कारक्षम बनवण्याचे मोठे दायित्व अंगीकारते.